राष्ट्रीय बातमी ः बॉयफ्रेंडने लग्नाला नकार दिला; तिने त्‍याला यमसदनी धाडले!

गुरुग्राम : ३ वर्षांचे प्रेम आणि शरीरसंबंध असताना बॉयफ्रेंडने लग्नाला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या गर्लफ्रेंडने त्याची हत्या केली. पंजाबच्या गुरुग्राममध्ये ही घटना घडली. आसिफ (२५, रा. बदायू, उत्तरप्रदेश) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याची प्रेयसी सोनिया (२६) हिला अटक केली आहे. आसिफ रिक्षाचालक होता. ३ वर्षांपासून आसिफ आणि सोनियाचे प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या …
 
राष्ट्रीय बातमी ः बॉयफ्रेंडने लग्नाला नकार दिला; तिने त्‍याला यमसदनी धाडले!

गुरुग्राम : ३ वर्षांचे प्रेम आणि शरीरसंबंध असताना बॉयफ्रेंडने लग्नाला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या गर्लफ्रेंडने त्‍याची हत्या केली. पंजाबच्या गुरुग्राममध्ये ही घटना घडली. आसिफ (२५, रा. बदायू, उत्तरप्रदेश) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी त्याची प्रेयसी सोनिया (२६) हिला अटक केली आहे.

आसिफ रिक्षाचालक होता. ३ वर्षांपासून आसिफ आणि सोनियाचे प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांचे संबंध बिघडले होते. आसिफसाठी घरच्यांनी दुसरी मुलगी शोधली होती. त्याचे लग्न होणार होते. त्यामुळे सोनिया संतापली होती. दोघांचे संबंधाचे फोटो आसिफजवळ होते. ते फोटो व्हायरल होतील, अशीही भीती सोनियाला होती.

त्यामुळे सोनियाने तिचा जालंधर येथील मित्र याकूब (२४) याला गुरुग्राममध्ये बोलावले. दोघांनी आसिफला घाटा नावाच्या गावाबाहेर बोलण्यासाठी निर्जनस्थळी बोलावले. तिथे आसिफवर लोखंडी सळईने हल्ला करून यमसदनी धाडले. हत्येनंतर अवघ्या दोनच दिवसांत पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध लावला. सोनिया व याकूबला अटक करण्यात आली असून, हत्येसाठी वापरण्यात आलेली सळई आणि दगड जप्त करण्यात आले आहेत.