रस्ता चुकलेल्या आठ वर्षीय पाकिस्तानी मुलाला चॉकलेट देऊन परत पाठवले
बीएसएफच्या जवानांचे असेही औदार्य; राजस्थान सीमेवरील घटना
बाडमेर : भारत-पाकिस्तानचे संबंध अपवादानाचे चांगले राहिले आहेत.कारण भारताने मनाचा मोठेपणा दाखूवन कितीही प्रयत्न केले तरी पाकिस्तान नेहमीच वाकड्यात शिरतो. तरीही भारत संधी मिळेल तेव्हा माणुसकीचे दर्शन घडवल्याशिवाय राहत नाही. राजस्थानात बाडमेर बॉर्डरवर एक आठ वर्षाचा पाकिस्तानी मुलगा चुकून भारतीय हद्दीत आला. रस्ता चुकल्याने तो बराच मध्ये आला असता भारतीय जवानांनी धीर देत त्याला चॉकलेट व खाद्यपदार्थ देऊन पाकिस्तानी हद्द़ीत सुखरूप परत जाऊ दिले.
बीएसएफच्या गुजरात प्रंटियरचे डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल एम.एल. गर्ग यांनी सांगिले की, एक आठ वर्षाचा पाकिस्तानी मुलगा शुक्रवारी सायंकाळी चुकून भारतीय हद्दीत आला होता. आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सोमरतच्या बॉर्डर पिलर नंबर ८८८/२-एसजवळ ही घटना घडली. सुरक्षेसाठी तैनात बीएसएफच्या जवानांनी मुलाजवळ जाऊन त्याची चौकशी केली. तेव्हा तो रडायला लागला. जवानांनी त्याचे नाव, गाव, आई-वडिलांची माहिती विचारली. त्याने त्याचे नाव करीम यमून पठाण असे सांगितले. तो नगर पारकर येथील राहणारा असल्याचे सांगितले. जवानंी त्याला बिस्किट, चॉकलेट खाऊ घालून शांत केले. नंतर पाकिस्तानी जवानांसोबत फ्लॅग मिटींग करून त्या मुलाला त्यांच्या ताब्यात दिले. भारताने जरी मनाचा मोठेपणा दाखवला असला तरी पाक असे करत नाही.नोव्हेंबरमध्ये एक १९ वर्षीय तरुण पाकच्या हद्दीत चुकून गेला होता. पण पाकने अद्याप त्याला भारतात परत पाठवलेले नाही.