‘या’ देशात मुली कितीही लग्न करू शकतात…

नवी दिल्ली ः जगातील प्रत्येक देशात नियम, प्रथा, परंपरा, रुढी, चालीरीती वेगवेगळ्या असतात. काही परंपरा तर अमानवी, विचित्र असतात. जगातील एका देशात तर मुलींना इतके स्वातंत्र्य आहे, की त्या कितीही लग्न करू शकतात. हा देशच एकदम वेगळा आहे. इथे महिला पुरुषांसारख्या वागतात आणि पुरुष महिलांसारखे. ही जगावेगळी कल्पना वाटेल; परंतु ही वस्तुस्थिती आहे. विशेष म्हणजे …
 

नवी दिल्ली ः जगातील प्रत्येक देशात नियम, प्रथा, परंपरा, रुढी, चालीरीती वेगवेगळ्या असतात. काही परंपरा तर अमानवी, विचित्र असतात. जगातील एका देशात तर मुलींना इतके स्वातंत्र्य आहे, की त्या कितीही लग्न करू शकतात.

हा देशच एकदम वेगळा आहे. इथे महिला पुरुषांसारख्या वागतात आणि पुरुष महिलांसारखे. ही जगावेगळी कल्पना वाटेल; परंतु ही वस्तुस्थिती आहे. विशेष म्हणजे मागासलेल्या या देशाचं नाव आहे नायजर. तिथल्या प्रथा इतरांपेक्षा खूप वेगळ्या आहेत. पश्चिम आफ्रिकेत नायजर हा देश आहे. तिथं राहणाऱ्या तुआरेग लोकांमध्ये स्त्रियांना त्यांना हवं ते काम करण्याचं स्वातत्र्य आहे. येथे लग्नाआधी स्त्रियांना अनेक पुरुषांशी संबंध ठेवण्याची परवानगी आहे. ऐकून आश्चर्य वाटेल; परंतु येथील पुरुषांना बुरख्यामध्ये राहाव लागतं. त्यांना कुठंही जाण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागते. पुरुषांना आपला चेहरा समाजापासून लपवून ठेवावा लागतो, तर महिलेला लग्नानंतरही कोणत्याही पुरुषाशी संबंध ठेवता येतात.

स्त्रियांना जर त्यांच्या पतीला सोडून द्यायची इच्छा झाली असेल, तर त्या सोडू शकतात. पुरुषांना आपला चेहरा समाजापासून लपवून ठेवावा लागतो. तुआरेग समाजात महिलांचा विवाह आणि घटस्फोट हे सामान्य आहे. घटस्फोट मिळाल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांकडून उत्सव साजरा केला जातो. महिला कोणताही बुरखा, पदर किंवा परदा घेत नाहीत. कारण त्यांचे चेहरे पुरुषांना दिसायला हवेत. महिलांची परवानगी घेतल्याशिवाय पुरुषांना कोणताही मोठा निर्णय घेता येत नाही.