मोदींचा शेतकऱ्यांना दिलासा… खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ!

नवी दिल्ली (लाइव्ह ग्रुप वृत्तसेवा) ः केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देताना खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP)वाढ केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी ही माहिती दिली. भातासाठी ७२ रुपयांची वाढ केली असून, १८६८ रुपये प्रतिक्विंटल भात आता १९४० प्रतिक्विंटल केला आहे. बाजरी प्रतिक्विंटल २१५० रुपयांवरून २२५० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली …
 

नवी दिल्ली (लाइव्‍ह ग्रुप वृत्तसेवा) ः केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देताना खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत (MSP)वाढ केली आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी ही माहिती दिली.

भातासाठी ७२ रुपयांची वाढ केली असून, १८६८ रुपये प्रतिक्विंटल भात आता १९४० प्रतिक्विंटल केला आहे. बाजरी प्रतिक्विंटल २१५० रुपयांवरून २२५० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली तर तूर आणि उडीद डाळ 3०० रुपये प्रतिक्विंटल आणि तिळाचे भाव ४५२ रुपये प्रति क्विंटल करण्यात आले आहे. सर्व पक्षांना कृषी कायदा आणायचाय मात्र त्यांचे साहस होऊ शकले नाही. केंद्र सरकारने ११ वेळा शेतकऱ्यांशी चर्चा केली. मात्र कोणत्याही शेतकरी संघटनेने किंवा कोणत्याही पक्षाने यावर उत्तर दिले नाही. त्यामुळे चर्चा पुढे जाऊ शकली नाही. जेव्हा शेतकरी चर्चेसाठी तयार असतील, तेव्हा आम्ही चर्चेसाठी तयार असू, असेही ते म्‍हणाले.