मैत्रिणीसोबत हॉटेलवर आला, कंडोम नव्‍हते… मग जे केले ते ऐकून तुम्‍ही व्‍हाल हैराण, पण गेलाय त्‍याचा प्राण!

अहमदाबाद ः मैत्रिणीसोबत शरीरसंबंध ठेवताना कंडोम नव्हता. मग काय गड्याने चक्क आपले गुप्तांग चिकट पदार्थाने सील केले आणि संबंध ठेवले. पण नंतर त्याला एकाएकी त्रास सुरू झाला आणि प्राण गमवावे लागले. ही घटना गुजरातमधील अहमदाबादमध्ये समोर आली आहे. तरुणाचे वय २५ आहे. ही घटना थोडी आश्चर्यस्पदच वाटत असल्याने पोलिसांनी तपास थांबवलेला नाही. अहमदाबादच्या फतेहवाडी भागात …
 
मैत्रिणीसोबत हॉटेलवर आला, कंडोम नव्‍हते… मग जे केले ते ऐकून तुम्‍ही व्‍हाल हैराण, पण गेलाय त्‍याचा प्राण!

अहमदाबाद ः मैत्रिणीसोबत शरीरसंबंध ठेवताना कंडोम नव्‍हता. मग काय गड्याने चक्‍क आपले गुप्‍तांग चिकट पदार्थाने सील केले आणि संबंध ठेवले. पण नंतर त्‍याला एकाएकी त्रास सुरू झाला आणि प्राण गमवावे लागले. ही घटना गुजरातमधील अहमदाबादमध्ये समोर आली आहे. तरुणाचे वय २५ आहे. ही घटना थोडी आश्चर्यस्पदच वाटत असल्याने पोलिसांनी तपास थांबवलेला नाही.

अहमदाबादच्या फतेहवाडी भागात सलमान मिर्झा नावाचा हा तरुण राहत होता. मैत्रिणीसोबत तो जुहापुरा भागातील हॉटेलमध्ये गेला. तिथे दोघांनी आधी ड्रग्ज घेतले. नंतर शरीरसंबंध ठेवण्याची तयारी केली. मात्र त्‍याच्याकडे कंडोम नसल्याने गुप्‍तांगाला चिकट पदार्थाने पॅक करण्याचा निर्णय त्‍याने घेतला. केलेही तसेच. हा सर्व खटाटोप याकरिता होता की मैत्रीण प्रेग्‍नंट राहू नये.

दुसऱ्या दिवशी सकाळी सलमान अंबर टॉवरजवळ झुडुपात बेशुद्धावस्थेत आढळला. ओळखीच्या व्‍यक्‍तीने त्‍याच्‍या नातेवाइकांना कळवून घरी नेले. तिथून सोला सामान्य रुग्‍णालयात हलवले. मात्र उपचारादरम्‍यान त्‍याचा मृत्यू झाला. प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले, की चिकट पदार्थाच्या वापरामुळे सलमानची तब्‍येत बिघडली. पण ती कशी बिघडली हे मृतदेहाची उत्तरीय तपासणी अहवाल आल्यावर कळेल.