मी नरेंद्र मोदी नाही, मला खोटे बोलण्याची सवय नाही

राहुल गांधींचा पंतप्रधानांवर पुन्हा एकदा हल्लाबोलगुवाहाटी : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांचा ज्वर जोरावर आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करताना त्यांना खोटे बोलण्याची सवय असल्याची टीका केली आहे.दिब्रुगड येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. त्यावेळी त्यांनी मोदींवरही …
 

राहुल गांधींचा पंतप्रधानांवर पुन्हा एकदा हल्लाबोल
गुवाहाटी :
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोपांचा ज्वर जोरावर आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करताना त्यांना खोटे बोलण्याची सवय असल्याची टीका केली आहे.
दिब्रुगड येथे आयोजित प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. त्यावेळी त्यांनी मोदींवरही टीकास्त्र सोडले. त्यांच्यामुळे देशात लोकशाहीचे पतन होत आहे,बेरोजगारी वाढली आहे. नागपुरात जन्मलेली एक संघटना संपूर्ण देशावर राज्य (नियंत्रण) करू पाहत आहे. पण मला खोटे बोलण्याची सवय नाही. मी नरेंद्र मोदी नाही. त्यामुळे लोकांना जी आश्वासने देईन ती पूर्णच करेन. आसाममध्ये आमची सत्ता आल्यास नागरीकत्व कायदा रद्द केला जाईल, असे राहुल म्हणाले. यावेळी राहुल यांनी चहाच्या मळळ्यातील कामगारांशी संवाद साधून त्यांच्यासोबत बसून जेवणही घेतले.