मित्राच्‍या बायकोला दिली संबंधाची ऑफर!; तिने भाजप नगरसेवकाला धो धो धुतला!!

बालौदबाजार : वहिणी-दिराच्या नात्यात सर्व चालते, असे म्हणत भाजपा नगरसेवकाने मित्राच्या बायकोलाच शरीरसंबंधाची ऑफर दिली. यामुळे संतप्त महिलेचा पारा इतका चढला की तिने या नगरसेवकाला चोप देणे सुरू केले. पतीलाही तिने सोडले नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून, छत्तीसगडमधील बलौदाबाजार येथील ही घटना आहे. सूर्यकांत ताम्रकर असे मार खाणाऱ्या नगरसेवकाचे नाव आहे. जीवलग …
 
मित्राच्‍या बायकोला दिली संबंधाची ऑफर!; तिने भाजप नगरसेवकाला धो धो धुतला!!

बालौदबाजार : वहिणी-दिराच्या नात्यात सर्व चालते, असे म्हणत भाजपा नगरसेवकाने मित्राच्‍या बायकोलाच शरीरसंबंधाची ऑफर दिली. यामुळे संतप्‍त महिलेचा पारा इतका चढला की तिने या नगरसेवकाला चोप देणे सुरू केले. पतीलाही तिने सोडले नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्‍हायरल होत असून, छत्तीसगडमधील बलौदाबाजार येथील ही घटना आहे. सूर्यकांत ताम्रकर असे मार खाणाऱ्या नगरसेवकाचे नाव आहे. जीवलग मित्राच्‍या घरी तो गेला होता. मात्र त्‍याची नजर मित्राच्‍या बायकोवरच फिरली. त्‍याने तिला थेट संबंध ठेवण्याची ऑफर दिली. त्‍याची ऑफर ऐकून तिच्‍या तळपायाची आग मस्‍तकात गेली. तिने त्‍याला बेदम चोप दिला. मध्ये पडणाऱ्या पतीलाही तिने सोडले नाही.