मित्रांशी बोलण्यास विरोध करणार्या पतीचे गुप्तांग कापले
उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना; पती गंभीर जखमी
गोपाळगंज : रागाच्या भरात एखादी व्यक्ती काय करेल, कोणत्या टोकाला जाईल काही सांगता येत नाही. पण उत्तर प्रदेशातील एका महिलेने रागाच्या भरात चक्क पतीचे गुप्तांगच कापल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. मित्र व इतर पुरुषांना फोनवर बोलण्यास पतीने पिवरोध केला म्हणून रागाच्या भरात तिने हे कृत्य केले. या घटनेत गंभीर जखमी झालेले हे पतीमहाशय सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर पोलीस त्या आरोपी महिलेची चौकशी करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, बिहारच्या गोपाळगंज जिल्ह्यातील गोविंद नावाच्या युवकाचे उत्तर प्रदेशातील हरिवंश पट्टी गावातील मुलीशी चार महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले.दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यामुळे त्यांना एकमेकांचा विरहदेखील सहन होत नव्हता. पण लग्नानंतरही गोविंदची पत्नी त्याच्यापेक्षा तिच्या मित्रांना व इतर पुरुषांशीच फोनवर तासनतास बोलत होती. ही बाब गोविंदला खटकत होती. त्यावरुन त्या दोघात हल्ली सातत्याने भांडण होत होते. गेल्या आठवड्यात भांडण झाल्यानंतर गोविंदची पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यानंतरही गोविंदने समजुतीने घेत पत्नीची समजूत काढण्यासाठी तिच्या मागे सासरवाडीला गेला.माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, असे म्हणत त्याने पत्नीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तिचा राग अजूनही शांत झालेला नव्हता. त्यामुळे तिने पुन्हा भांडण उकरून काढले. कुटुंबियांनी मध्यस्ती करून त्यांच्यातील वाद सोडवला. त्यानंतर रात्री ते दोघे वेगवेगळ्या खोलीत झोपले. पण मध्यरात्री उठून पत्नी त्याच्या खोलीत गेली.तिने रागाच्या भरात ब्लेड घेऊन गोविंदचे गुप्तांगच कापून टाकले. त्याने आरडाओरड केल्यानंतर घरचे लोक धावून आले. त्यांनी महिलेला दूर करत गोविंदला गोपाळगंज येथील रुग्णालयात दाखल केले. सध्या तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर त्याच्या पत्नीविरोधात बिहरमधील उचका गावातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.