महिलेने अल्पवयीन मुलाचे केले लैंगिक शोषण, गर्भवती झाली

वॉशिंग्टन (महाराष्ट्र न्यूज लाइव्ह वृत्तसेवा) ः महिला, मुलींवर पुरुषांकडून लैंगिक अत्याचाराच्या घटना रोज ऐकायला मिळतात. परंतु एका महिलेकडूनच अल्पवयीन मुलावर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना अमेरिकेत समोर आली आहे. वर्षभर मुलाचे लैंगिक शोषण करणारी महिला गर्भवती असल्याचा खुलासा पोलिसांनी केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. वॉशिंग्टन शहरात राहणाऱ्या ब्रिटनी ग्रे या महिलेने एका …
 

वॉशिंग्टन (महाराष्ट्र न्‍यूज लाइव्‍ह वृत्तसेवा) ः महिला, मुलींवर पुरुषांकडून लैंगिक अत्याचाराच्या घटना रोज ऐकायला मिळतात. परंतु एका महिलेकडूनच अल्पवयीन मुलावर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना अमेरिकेत समोर आली आहे. वर्षभर मुलाचे लैंगिक शोषण करणारी महिला गर्भवती असल्याचा खुलासा पोलिसांनी केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.

वॉशिंग्टन शहरात राहणाऱ्या ब्रिटनी ग्रे या महिलेने एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलाला जाळ्यात ओढले. वासना भागविण्यासाठी तिने वर्षभर त्याचे लैंगिक शोषण केले. एका व्यक्तीने हा प्रकार पाहिल्यानंतर प्रकरण समोर आले. बाल अत्याचार आयोगाला संपर्क करून त्‍या व्यक्तीने याबाबतची तक्रार केली. प्रकरण पोलिसांकडे गेल्यानंतर त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. महिला गर्भवती असल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. ५ हजार डॉलरचा बाँड भरल्यानंतर महिलेची तुरुंगातून सुटका करण्यात आली.