महिला पडली एलियनच्‍या प्रेमात, बेडरूममधून पळवून नेल्याचा करते दावा!

लंडन ः जग अजूनही एलियनच्या अस्तित्वावर वाद घालत आहे. मात्र एका ब्रिटिश महिलेने असा दावा केला आहे की ती एलियन्सच्या प्रेमात पडली आहे. यूएफओच्या माध्यमातून एलियनने तिला तिच्या बेडममधून पळवून नेले, असा दावा अब्बी बेला हिने केला आहे. व्यवसायाने अभिनेत्री असलेल्या अॅबी बेलाने एलियन लोकांना भेटल्याचा दावा केला. सोबत असेही सांगीतले की पृथ्वीवरील माणसांपेक्षा एलियन्स …
 

लंडन ः जग अजूनही एलियनच्या अस्तित्वावर वाद घालत आहे. मात्र एका ब्रिटिश महिलेने असा दावा केला आहे की ती एलियन्सच्या प्रेमात पडली आहे. यूएफओच्या माध्यमातून एलियनने तिला तिच्या बेडममधून पळवून नेले, असा दावा अब्बी बेला हिने केला आहे. व्यवसायाने अभिनेत्री असलेल्या अ‍ॅबी बेलाने एलियन लोकांना भेटल्याचा दावा केला. सोबत असेही सांगीतले की पृथ्वीवरील माणसांपेक्षा एलियन्‍स चांगले आहेत.
डेली स्टारच्या अहवालानुसार, या महिन्यात अब्बीने असा दावा केला होता की तिला एलियनने पळवून नेले होते. ती म्हणाली की तिला ज्या एलियनने हृदय दिले व तिच्यावर प्रेम केले तो एंड्रोमेडा गॅलेक्सीमधून आला होता. ती पुन्हा तिच्या प्रियकराला भेटायला उत्सुक आहे. अब्बी म्हणाली, की मी पृथ्वीवरील लोकांचा तिरस्कार करते, मी सहज ऑनलाइन जोक टाकला की मला एलियन्सनी पळवून न्यावे. त्यानंतर मी रोज रात्री पांढऱ्या प्रकाशाबद्दल स्वप्न पाहण्यास सुरुवात केली.

एके रात्री स्वप्नात माझा आवाज म्हणाला एका सामान्य ठिकाणी थांब. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी माझ्या बेडरूममध्ये खिडकी उघडून तिथे बसले होते. मी झोपायला जाणार तेवढ्यात चमकदार हिरव्या प्रकाशाने मला यूएफओच्या आत नेले. यूएफओत ५ एलियन होते आणि त्यातील एक एलियन माणसासारखा होता. तिने सांगितले, की ती सुमारे २० मिनिटांनी पूर्व लंडनमधील तिच्या घरी परत आली. ती आता रोज रात्री तिची बॅग भरून तयार ठेवते आणि म्हणते, मला आशा आहे की तो परत येईल. मला पुन्हा अँड्रोमेडा गॅलेक्सीवर जायचे आहे.