मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदाराच्या पुत्रावर बलात्काराचा आरोप

उज्जैन : राजकीय नेत्याची मुले पित्याला कधी अडचणीत आणतील काही सांगता येत नाही. मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार मुरली मोरवाल यांच्या मुलाविरुद्ध एका युवतीने बलात्काराचा आरोप केला असून त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यात तिने आरोपीने नशेचा पदार्थ पाजवून व लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे.मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार मुरली मोरवाल …
 

उज्जैन : राजकीय नेत्याची मुले पित्याला कधी अडचणीत आणतील काही सांगता येत नाही. मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार मुरली मोरवाल यांच्या मुलाविरुद्ध एका युवतीने बलात्काराचा आरोप केला असून त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यात तिने आरोपीने नशेचा पदार्थ पाजवून व लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने केला आहे.
मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आमदार मुरली मोरवाल यांचा मुलगा करण याचयाविरोधात इंदौर येथील महिला पोलीस ठाण्यात पीडित युवतीने तक्रार दिली आहे. करण मोरवाल हा जिल्हा युवक काँग्रेसचा कार्यकारी अध्यक्षदेखील आहे.विशेष म्हणजे ज्या पीडित तरुणाने ही तक्रार दिली तीदेखील युवक काँग्रेसची कार्यकर्ती आहे.आमदारपुत्राविरोधात तक्रार दिलेल्या युवतीने सांगितले की करणने लग्नाचे आमिष दाखवून फेब्रुवारीत तिच्यावर बलात्कार केला. तसेच नशेचा पदार्थ देऊन तिचे शोषण केले.घटनेनंतर पोलीस प्रकरणाची शहनिशा करत असून आरोपीचाही शोध घेतला जात आहे.