भारतातील पहिले सेक्स टॉईजचे दुकान महिनाभरातच बंद!
गोव्यात झाले होते सुरू, ग्रामपंचायतीने केला विरोध
पणजी : सेक्स टॉईज ही संकल्पना अद्याप भारतात तितकी लोकप्रिय नाही. परंतु विदेशात तिचा भलताच बोलबाला आहे. विदेशात सेक्स टॉईजची ऑनलाईन विक्री होते. तसेच ऑफलाईनदेखील ते स्टोअर्स, मॉलमध्ये उपलब्ध असतात. पण भारतात तशी परिस्थिती अद्याप आलेली नव्हती. पण गोव्यात येणार्या विदेशी पर्यटकांची मोठी संख्या लक्षात घेऊन गोव्यात केलंग्यूट येथे कामा गिजमोस नावाचे एक सेक्स टॉईजचे शॉप गेल्या महिन्यात व्हॅलेंटाईन वीकमध्ये सुरू करण्यात आले होते. भारतातील ते पहिलेच सेक्स टॉइज दुकान असल्याने त्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. तरुणाईमध्ये त्याची क्रेझही तयार व्हायला लागली होती. पण हे दुकान सुरू झाल्यानंतर त्याला स्थानिक पातळीवर विरोध सुरू झाला होता. स्थानिक पंचायतीने हे दुकान व तेथे विकल्या जाणार्या सेक्स टॉईजवर आक्षेप घेतला होता. भर मार्केटमध्ये असलेल्या या दुकानामुळे आमचा पर्यटन व्यवसायावर परिणाम होत होता. ऑनलाईन सेक्स टॉय स्टोर गिजमोसवाला व सेक्स्युअल वेलनेस स्टोर चेन कामाकार्ट यांनी संयुक्त उपक्रमाअंतर्गत हे शॉप सुरू केले होते.पण सदर दुकान सुरू करण्यापूर्वी ग्रामपंचायतीची परवानगी घेण्यात आलेली नव्हती. त्या दुकानमालकांकडे त्याचा रितसर परवानाही नव्हता.शिवाय दुकानात विकल्या जाणार्या वस्तूंबाबत अनेक पुरुष व महिलांनी आक्षेप घेतल्याने अखेर व्यवस्थापनाने हे दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दुकानाचे होर्डींग व बोर्डही हटविण्यात आले आहेत. पण हे दुकान बंद केल्याने यंग जनरेशनच्या प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केल्याचेही वृत्त असून दुसरीकडे दुकान व्यवस्थापक रितसर सर्व परवानग्या काढून पुन्हा दुकान सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही समजते.