भाजी विक्रेत्याला लागली नगराध्यक्षपदाची लॉटरी

हैदराबाद : कोणत्या व्यक्तीची कधी लॉटरी लागेल व कोणत्या पदाची माळ कधी कुणाच्या गळ्याात पडेल काही सांगता येत नाही. आंध्र प्रदेशात अशीच एक घटना घडली असून तेथे एका भाजीविक्रेत्याला चक्क शहराच्या नगराध्यक्षपदाची लॉटरी लागली आहे. कोणतीही अपेक्षा नसताना अचानक शहराचा नगराध्यक्ष होण्याचे भाग्य लाभल्याने या भाजीवाल्याच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली आहे. आंध्र प्रदेशात नुकत्याच पार …
 

हैदराबाद : कोणत्या व्यक्तीची कधी लॉटरी लागेल व कोणत्या पदाची माळ कधी कुणाच्या गळ्याात पडेल काही सांगता येत नाही. आंध्र प्रदेशात अशीच एक घटना घडली असून तेथे एका भाजीविक्रेत्याला चक्क शहराच्या नगराध्यक्षपदाची लॉटरी लागली आहे. कोणतीही अपेक्षा नसताना अचानक शहराचा नगराध्यक्ष होण्याचे भाग्य लाभल्याने या भाजीवाल्याच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली आहे. आंध्र प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या न.प./ महापालिकांच्या निवडणुकीत सत्ताधारी वायएसआर काँग्रेसने जबरदस्त कामगिरी करत अनेक संस्था ताब्यात घेतल्या. रायचोटी नग पालिकेतही वायएसआर काँग्रेसची सत्ता आली. तेथे पक्षाने शेख बाशा नामक पदवीधर तरुणाला नगराध्यक्ष होण्याची संधी दिली. शेख बाशा हे व्यवसायाने भाजीविक्रेते आहेत. ते गावात फिरून भाजीविक्री करतात. पण आता नगराध्यक्ष म्हणून जनतेची सेवा करणार आहेत. बाशा यांनी याबद्दल मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे आभार मानले आहेत. त्यांनी माझ्यासारख्या पदवीधर बेरोजगार तरुणाला नगराध्यक्ष होण्याची संधी दिली. त्याआधी मला नगरसेवक म्हणून उमेदवारी दिली.याआधी माझ्या जीवनाचे उद्दीष्ट नव्हते. पण आता मला नवी दिशा मिळाली आहे,असेही बाशा यांनी सांगितले. यानिवडणुकीत वायएसआर काँग्रेसने महिलांना ६० टक्के व मागास समुदायांना ७८ टक्के पदे बहाल केली आहेत.