भर रस्त्यात मिठी मारणार्‍या तरुणाला युवतीने बदडले

नोएडा : एक तरुणी कामानिमित्त रस्त्यावरून जात असताना सायकलवर आलेल्या तरुणाने अचानक तिला मिठी मारली व काही कळायच्या आत तो पळूनही जाऊ लागला. पण भानावर येत संतापलेल्या युवतीने पाठलाग करून त्या तरुणाला पकडले आणि भर रस्त्यात त्याची देमार धुलाई केली. विशेष म्हणजे हा प्रकार घडत असताना कुणीही बघे लोक त्या तरुणीच्या मदतीला धावले नाहीत.उत्तर प्रदेशात …
 

नोएडा : एक तरुणी कामानिमित्त रस्त्यावरून जात असताना सायकलवर आलेल्या तरुणाने अचानक तिला मिठी मारली व काही कळायच्या आत तो पळूनही जाऊ लागला. पण भानावर येत संतापलेल्या युवतीने पाठलाग करून त्या तरुणाला पकडले आणि भर रस्त्यात त्याची देमार धुलाई केली. विशेष म्हणजे हा प्रकार घडत असताना कुणीही बघे लोक त्या तरुणीच्या मदतीला धावले नाहीत.
उत्तर प्रदेशात नोएडातील सेक्टर बारामध्ये भरदिवसा हा प्रकार घडला. ही तरुणी पेट्रोल पंपाच्या दिशेने जात होती. ती त्या परिसरात कामाला आहे. अचानक एक तरुण सायकलवर तिच्याजवळ आला. त्याने तिला रस्त्यात अडवले व चक्क मिठीच मारली. त्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला युवतीला काय घडतेय हे समजले नाही. पण लगेच भानावर येत तिने त्या तरुणाचा पाठलाग केला. त्याला सायकलवरून खाली पाडले व बेदम चोप दिला. चपलेने प्रसाद देऊन त्याला चांगलीच अद्दल घडवली. या घटनेचा व्हिडीओ कुणी तरी शुट करून सोशल मीडियातून व्हायरल केला. त्याची दखल घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला आहे.