बॉयफ्रेंडसोबत फिरायला आलेल्या महाराष्ट्रातील तरुणीवर म्‍हैसूरमध्ये टोळक्‍याचा सामूहिक बलात्‍कार

म्हैसूर ः बॉयफ्रेंडसोबत फिरायला आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना कर्नाटकातील म्हैसूरजवळील चामुंडी हिल्स भागात समोर आली आहे. या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अद्याप आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पीडित तरुणी महाराष्ट्रातील असल्याचे समोर आले आहे. ती एमबीए असून सध्या बोलण्याच्या मनःस्थितीत नाही. त्यामुळे पोलिसांना जबाबही घेता आलेला नाही. सहा …
 
बॉयफ्रेंडसोबत फिरायला आलेल्या महाराष्ट्रातील तरुणीवर म्‍हैसूरमध्ये टोळक्‍याचा सामूहिक बलात्‍कार

म्हैसूर ः बॉयफ्रेंडसोबत फिरायला आलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्‍कार करण्यात आल्याची घटना कर्नाटकातील म्‍हैसूरजवळील चामुंडी हिल्स भागात समोर आली आहे. या घटनेमुळे पर्यटकांच्‍या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अद्याप आरोपींना शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पीडित तरुणी महाराष्ट्रातील असल्याचे समोर आले आहे. ती एमबीए असून सध्या बोलण्याच्‍या मनःस्‍थितीत नाही. त्‍यामुळे पोलिसांना जबाबही घेता आलेला नाही. सहा आरोपींपैकी दोघांनी तिच्‍यावर बलात्‍कार केल्याचे समोर येत आहे.

दोघे निसर्गाचा आनंद घेत होते. तितक्‍यात सहा टवाळखोरांनी त्‍यांना घेरले. त्‍यांनी आधी पैशांची मागणी केली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने त्‍यांनी तिच्‍या बॉयफ्रेंडला मारहाण करण्यास सुरुवात केली. तेवढ्यावरच न थांबता त्‍यांनी तरुणीला पकडून सामूहिक बलात्‍कार केला. तिच्‍या बॉयफ्रेंडने तिला वाचविण्याचा प्रयत्‍न केला, मात्र टोळक्‍यासमोर त्‍याचे काही चालले नाही. बलात्‍काराला विरोध करताना तरुणीला मोठ्या इजा झाल्या आहेत. तिला मानसिक धक्‍काही बसला आहे. तिच्‍यावर सध्या उपचार सुरू आहेत. तिच्‍या बॉयफ्रेंडने पोलिसांना सांगितले, की मी तिला टवाळखोरांपासून वाचविण्याचा प्रयत्‍न केला. मात्र त्‍यांच्‍यापुढे माझं काहीच चाललं नाही. हे दोघे बंगळुरूहून या ठिकाणी फिरायला आले होते.