प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणत टिकटॉक स्टारने घेतला गळफास
लग्नासाठी महिला फॅनचा करत होता आग्रह
पेशावर : तरुण पिढीमध्ये प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची नशा कायम पाहायला मिळत असते. यातूनच एका २० वर्षीय पाकिस्तानी टिकटॉक स्टारने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. एकतर्फी प्रेमातून मिळालेला नकार तो पचवू शकला नाही व नैराश्यातून त्याने मृत्यूला कवटाळले. शहजाद अहमद असे या पाकिस्तानी युवकाचे नाव आहे. स्थानिक मीडियानुसार पेशावरचा राहणार्या शहजादचे १० लाख फॉलोअर्स होते. त्यापैकी त्याची फॅन असलेल्या एका तरुण महिलेवर त्याचे प्रेम जडले व त्याने तिला निकाह करण्याचा प्रस्तावही पाठवला होता. पण तिने तो नाकारला. त्याने तिला पटविण्याचा अनेकदा प्रयत्नही केला. पण ती नकारावर ठाम होती. हा नकार शहजाद पचवू शकला नाही. त्यातून त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे शहजादने याआधीही झोपेच्या तब्बल ५० गो़ळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पण त्यावेळी त्याला डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचवले होते.