प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या सासूची वेगळ्या पद्धतीने हत्‍या!; सुप्रिम कोर्ट म्‍हणाले, हे नेहमीचंच झालंय…!!

नवी दिल्ली : प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या सासूला विषारी सर्पदंश घडवून आणत सुनेनेच हत्या करवली. या प्रकरणातील आरोपींना जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. “विषारी साप आणायचा आणि त्याच्या साह्याने हत्या करवायची हा नवा ट्रेंड राजस्थानात वाढला असून, हे नेहमीचंच झाल्याची टिप्पणी यावेळी न्यायमूर्तींनी केली. न्यायमूर्ती एन. व्ही. रमन्ना, सूर्यकांत आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे या …
 
प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या सासूची वेगळ्या पद्धतीने हत्‍या!; सुप्रिम कोर्ट म्‍हणाले, हे नेहमीचंच झालंय…!!

नवी दिल्ली : प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या सासूला विषारी सर्पदंश घडवून आणत सुनेनेच हत्‍या करवली. या प्रकरणातील आरोपींना जामीन देण्यास सर्वोच्‍च न्‍यायालयाने नकार दिला. “विषारी साप आणायचा आणि त्याच्या साह्याने हत्या करवायची हा नवा ट्रेंड राजस्थानात वाढला असून, हे नेहमीचंच झाल्‍याची टिप्पणी यावेळी न्‍यायमूर्तींनी केली.

न्यायमूर्ती एन. व्ही. रमन्‍ना, सूर्यकांत आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. २ जून २०१९ रोजी सुबोध देवी यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. घटनेच्या दीड महिन्यानंतर सुबोध देवी यांच्या पतीने सुनेवर संशय व्‍यक्‍त केला होता. त्‍यादृष्टीने पोलिसांनी तपास केला असता घटनेच्या दिवशी सुबोध देवीची सून अल्पना आणि मनीष नावाच्या व्यक्तीचे तब्‍बल १२४ वेळा बोलणे झाल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्‍यात घेत कसून चौकशी केली. चौकशीतून समोर आलेल्या माहितीमुळे पोलीसही चक्रावले. अल्पनाचे मनीषसोबत अनैतिक संबंध होते.

अल्पनाचा नवरा सचिन सैन्यात असल्याने घरी फारसा येत नव्हता. सुनेच्या अनैतिक संबंधाची माहिती सासूला कळली होती. त्‍यामुळे ती सुनेला विरोध करत होती. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याने अल्पनाने मनिषच्या मदतीने सासूचा काटा काढण्याचे ठरवले. मनीष व त्याचा मित्र कृष्णाकुमार यांनी १० हजार रुपयांत गारुड्याकडून विषारी साप आणला व दंश घडवून आणत सुबोध देवी यांचा खून केला.