पब्जी खेळू दिले नाही म्हणून मुलाने इमारतीवरून मारली उडी
मोबाईलच्या आहारी गेल्याने गमावला जीव
नवी दिल्ली : आजची पिढी झपाट्याने मोबाईलच्या आहारी जात असल्याची टीका सातत्याने होत असते. ते बर्याच प्रमाणात खरेही आहे. मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसन जडलल्या एका १५ वर्षीय मुलाने पालकांनी पब्जी गेम खेळू दिला नाही म्हणून एका उंच इमारतीवरून आत्महत्या केली.पोलिसांनी सांगितले की, नोएडा येथील सेक्टर ११० मध्ये एक १५ वर्षीय मुलगा उंच इमारतीवरून खाली पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यांनी घटनास्थळी जाऊन त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. पण तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.मृत मुलाचे नाव कोमल असे होते. तो मोबाईलवर ऑनलाईन पब्जी गेम खेळण्याच्या प्रचंड आहारी गेला होता.बुधवारी त्याच्या पालकांनी त्याच्या हातून मोबाईल हिसकावून घेतला आणि स्वत:जवळ ठेवला.त्यामुळे संतापलेला कोमल रागात घराबाहेर निघून गेला होता. नातेवाईकांनी रात्रभर त्याचा शोध घेतला. पण तो सापडला नाही. गुरुवारी सकाळी जवळच असलेल्या एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीखाली त्याचा मृतदेह आढळला. रात्री रागाच्या भरात त्याने तेथून खाली उडी घेऊन आत्महत्या केली.कोमल तीन बहिणींमध्ये एकच भाऊ होता.