नव्या “आयपीएस’ना मोदींचा मंत्र… सिस्टिमला बदलण्याचा निर्धार करा!
नवी दिल्ली ः पोलिसांची प्रतिमा सुधारणं मोठं आव्हान आहे. सिस्टिमला बदलण्याचा निर्धार करा. सिस्टिम तुम्हाला बदलेल असे वागू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ बॅचच्या आयपीएस प्रोबेशनर्सना केले. संवाद साधताना ते बोलत होते. या सर्व पोलिस अधिकाऱ्यांची विचारपूस करत पीएम मोदींनी काही सूचनाही केल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनीही …
Jul 31, 2021, 16:03 IST
नवी दिल्ली ः पोलिसांची प्रतिमा सुधारणं मोठं आव्हान आहे. सिस्टिमला बदलण्याचा निर्धार करा. सिस्टिम तुम्हाला बदलेल असे वागू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ बॅचच्या आयपीएस प्रोबेशनर्सना केले.
संवाद साधताना ते बोलत होते. या सर्व पोलिस अधिकाऱ्यांची विचारपूस करत पीएम मोदींनी काही सूचनाही केल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनीही या संवादला ऑनलाइन हजेरी लावली. नागरिकांत पोलिसांची प्रतिमा उंचावेल असे काम करा, असे आवाहनही त्यांनी केले. प्रत्येक पावलात आणि हालचालित नेशन फर्स्ट, अलवेज फर्स्ट ही भावना दिसायला हवी, असेही ते म्हणाले. यंदाचा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव आहे. पोलीस प्रशिक्षणासाठी पायभूत सुविधांमध्ये गेल्या काही वर्षांत सुधारणा केल्याचेही श्री. माेदी म्हणाले.