तहसीलमधील पटवारी निघाला दोन कोटींचा मालक
जमिनीच्या २५ रजिस्ट्री, लाखोंचे दागिने, पॉलिसी, आठ बँक खात्यात दहा लाखांची रोकड पाहून सगळेच चक्रावले
भोपाळ : सरकारी नोकरी करणारा सामान्य कारकूनही त्याच्या उत्पन्नापेक्षा सातपट जास्त संपत्ती कमवून कोट्यवधींचा मालक बनू शकतो. हा चमत्कार घडला तरी कसा? असा विचार करून त्याच्यावर धाड टाकणारे आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारीही चक्रावले आहेत.
मध्य प्रदेशात अनूपपूर जिल्ह्यातील कोतम तहसीलअंतर्गत बुर्हाणपूर येथे काम करणारा अशोक सोनी नावाचा पटवारी लाचखोरीच्या जाळ्यात अडकला. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्या संपत्तीची झाडाझडतील घेतली. तेव्हा अनेक शहरांत मोक्याच्या ठिकाणी त्याने जमिनी घेऊन ठेवल्याचे लक्षात आले. त्याच्या एकूण संपत्तीचे मूल्य तपासल्यानंतर ही असामी चक्क कोट्यवधींचा मालक असल्याचे स्पष्ट झाले. अशोक सोनीला आतापर्यंतच्या नोकरीचा पगार ए़कत्रित पगार २३.४४ लाख इतका मिळाला. तर त्याचे एकूण संपत्ती मूल्य सात पट अधिक १ कोटी ९२ लाखांच्याही पुढे आढळले आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या २६ सदस्यांच्या पथकाने अशोक सोनीच्या संपत्तीचा माग घेतला असता त्याच्याकडे शहर व गावात मिळून दोन मोठे बंगले, विविध आठ बँकांमध्ये खाती व त्यात दहा लाखांची रोख रक्कम, जिल्ह्यात विविध ठिकाणी घेऊन ठेवलेल्या जवळपास ६५ लाख रुपये किंमतीच्या २५ जमिनींrचे खरेदीखत, चार लखांचे दागिने, चार लाखांच्या विमा पॉलिसी, सहा लाखांची वाहने, पाच लाखांचे घरगुती सामानआदी ऐवज आदी मालमत्ता आढळून आली. ही संपत्ती त्याने २००७ मध्ये नोकरीला लागल्यानंतर कमावली होती हे विशेष.