टोमणा जिव्हारी; डाॅक्टर वहिणीवर हातोडी, कात्रीचे वार

वाराणसी : एखाद्याला एकदा टोमणा मारला, की तो दुर्लक्ष करू शकतो; परंतु वारंवार एखादी व्यक्ती टोमणे मारायला लागली, की मग ते असह्य होतं. संबंधित व्यक्तीचं काय करू काय नको, असं वाटायला लागतं. असाच प्रकार वाराणसीमध्ये घडला. डॉक्टर वहिनी दिराला सतत टोमणे मारायची. ते ऐकून दीर बेजार झाला. त्यानं हातोडी आणि कात्रीनं डाॅक्टर वहिणीवर सपासप वार …
 

वाराणसी : एखाद्याला एकदा टोमणा मारला, की तो दुर्लक्ष करू शकतो; परंतु वारंवार एखादी व्यक्ती टोमणे मारायला लागली, की मग ते असह्य होतं. संबंधित व्यक्तीचं काय करू काय नको, असं वाटायला लागतं. असाच प्रकार वाराणसीमध्ये घडला.

डॉक्टर वहिनी दिराला सतत टोमणे मारायची. ते ऐकून दीर बेजार झाला. त्यानं हातोडी आणि कात्रीनं डाॅक्टर वहिणीवर सपासप वार केले. दिरानं डॉक्टर विवाहितेला तिच्या क्लिनिकमध्ये जाऊनच संपवलं. डॉ. सपना गुप्ता-दत्ता असं हत्या झालेल्या वहिनीचं नाव याहे. दीर अनिल दत्तानं पोलिसात आत्मसमर्पण केलं. वाराणसीमधील रघुवर कॉलनीत डॉक्टर वहिनीचं क्लिनिक आहे. तिथं जाऊन दीराने तिचा जीव घेतला. मूल न होणं, होणं कशावर अवलंबून आहे, याची खरंतर डाॅक्टर वहिणीला कल्पना असायला हवी होती; परंतु मूल होत नसल्यानं डाॅक्टर वहिणी सतत टोमणे मारायची. आपल्या पुरुषत्वाचा तो अपमान आहे, असं दीराला वाटायचं.

चारचौघात होणारा पाणउतारा त्याला असह्य झाला. त्यामुळं वहिनीविषयी मनात राग साठला होता. त्यातून त्यानं डाॅक्टर वहिणीचा काटा काढला. वहिनीचं क्लिनिक बंगल्याच्या तळ मजल्यावर आहे. आरोपीचे आई-वडील तिथंच वरच्या मजल्यावर राहतात. त्यांना भेटण्याच्या निमित्तानं आल्यावर वहिनी टोमणे मारायची. त्याला टोमणे मारून ती थांबली नाही, तर भावाविषयीही ती आक्षेपार्ह बोलली. त्यामुळं त्याचा राग अनावर झाला. हातोडी आणि कात्रीनं डोक्यात वार करून तिची हत्या केली, अशी कबुली दीरानं दिली.