चार वर्षांच्या मुलाने मागितला पंतप्रधान मोदींकडे न्याय!; ३ महिन्यांचा असताना झाली होती वडिलांची हत्या

नवी दिल्ली ः चार वर्षांच्या रिझवान साहीद लासकर या मुलाने व्टिटरवर एक व्हिडिओ पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याकडे न्याय मागितला आहे. रिझवान हा आसामच्या कचर जिल्ह्यातील राहणारा आहे. त्याचे वडील कंत्राटदार होते. २६ डिसेंबर २०१६ रोजी सिलचर शहरात त्याचे वडील सैदुल अलोम लासकर यांची निर्घृण …
 
चार वर्षांच्या मुलाने मागितला पंतप्रधान मोदींकडे न्याय!; ३ महिन्यांचा असताना झाली होती वडिलांची हत्या

नवी दिल्ली ः चार वर्षांच्या रिझवान साहीद लासकर या मुलाने व्‍टिटरवर एक व्हिडिओ पोस्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांच्याकडे न्याय मागितला आहे.

रिझवान हा आसामच्या कचर जिल्ह्यातील राहणारा आहे. त्‍याचे वडील कंत्राटदार होते. २६ डिसेंबर २०१६ रोजी सिलचर शहरात त्‍याचे वडील सैदुल अलोम लासकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यावेळी रिझवान केवळ ३ महिन्यांचा होता. १२ वाळू माफियांनी ही निर्घृण हत्या केल्याची तक्रार रिझवानच्या आईने केली होती. यातील ९ आरोपींना अटक करण्यात आली मात्र ३ आरोपी अजूनही मोकाट असल्याचा आरोप रिझवानच्या आईने केला आहे. वडिलांच्या हल्लेखोरांना कठोर शिक्षा देऊन मला न्याय हवा आहे, अशी मागणी चिमुकल्या रिझवानने केली आहे.