गोठ्यात बांधून नराधमांनी तरुणीचे रात्रभर तोडले लचके! सामूहिक बलात्कार करताना दोन दिवस ठेवले उपाशी!!
रायपूर : १९ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्यावर रात्रभर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना छत्तीसगड राज्यातील रायपूरजवळील एका खेडेगावात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
१३ सप्टेंबरच्या संध्याकाळी १९ वर्षीय तरुणी पाणी भरण्यासाठी गावातील नळावर गेली होती. त्यावेळी गावातीलच तिघांनी तिचे अपहरण केले. आरोपींपैकी एकाच्या मालकीच्या जनावरांच्या गोठ्यात तरुणीला नेण्यात आले. तिथे तिचे हात पाय बांधून रात्रभर लैंगिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तरुणीला तिथेच बांधून ठेवण्यात आले.
मुलगी बेपत्ता झाल्याने आई- वडिलांनी हरविल्याची तक्रार पोलिसांत दिली. १५ सप्टेंबर रोजी गावातील त्या गोठ्यात जखमी अवस्थेत असलेल्या तरुणीला पोलिसांनी तिला शोधून काढले. तरुणीची अवस्था पाहून पोलीसही हादरून गेले. विजय कंवर (३०) रामलाल उर्फ बल्ला (३०) आणि हिरालाल(३०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.