ऑस्ट्रेलियन संसदेत अश्लिल चाळ्यांचा व्हिडिओ व्हायरल

खळबळजनक : खासदारांनी सेक्स वर्कर बोलावून केले अश्लिल चाळेसिडनी : काही दिवसांपूर्वी कर्नाटकच्या विधानसभेत मंत्री व आमदार कामकाजादरम्यान अश्लील व्हिडिओ पाहत असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्याप्रकरणी एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला होता. आता ऑस्ट्रेलियन संसदेत त्याहीपेक्षा धक्कादायक व गंभीर प्रकार उघउकीस आला आहे. ऑस्ट्रेलियन संसदेत चक्क सेक्स वर्करला बोलावून त्यांच्यासोबत काही सदस्य अश्लील …
 

खळबळजनक : खासदारांनी सेक्स वर्कर बोलावून केले अश्लिल चाळे
सिडनी :
काही दिवसांपूर्वी कर्नाटकच्या विधानसभेत मंत्री व आमदार कामकाजादरम्यान अश्लील व्हिडिओ पाहत असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्याप्रकरणी एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला होता. आता ऑस्ट्रेलियन संसदेत त्याहीपेक्षा धक्कादायक व गंभीर प्रकार उघउकीस आला आहे. ऑस्ट्रेलियन संसदेत चक्क सेक्स वर्करला बोलावून त्यांच्यासोबत काही सदस्य अश्लील चाळे करत असल्याचे आढळून आले आहे. या घटनेनंतर देशभर खळबळ उडाली असून पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी ही घटना अतिशय लाजिरवाणी असल्याचे स्पष्ट करत तिचा निषेध केला आहे. तसेच एका कर्मचार्‍याला तडकाफडकी निलंबित केले आहे.

ऑस्ट्रेलियन सरकारने या अश्लिल व्हिडिओ एका ग्रुप चॅटवर शेअर केला आहे. ज्यांनी हा व्हिडिओ लीक केला त्याचे नाव टॉम असे असून त्याने सांगितले की, सरकारी कर्मचारी व खासदार अनेकदा संसदेतील विशेष प्रार्थना कक्षाचा वापर सेक्स करण्यासाठी करतात.अनेकदा संसदेच्या आवारात सेक्स वर्कर्सना बोलावले जाते. गंभीर बाब म्हणजे आघाडी सरकारमधील खासदारांना खुष करण्यासाठी असे केले जाते असाही आरोप करण्यात आला आहे.. अनेकदा खासदार मंडळीच अश्लील फोटोची आदान-प्रदान करतात.या घटनेनंतर देशभरात खळबळ उडाली देशभर त्याविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत.या व्हिडिओमुळे मॉरिसन सरकार अडचणीत आले आहे. कारण एका सरकारी कर्मचार्‍याने अन्य एका महिला कर्मचार्‍यावर बलात्कार केल्याचे प्रकरण ताजे असून हे प्रकरण सरकारने नीट हाताळले नसल्याचा आरोप होत आहे. त्यातच आता या प्रकरणाची भर पडली आहे. या प्रकरणाचा सरकारने व्यवस्थित तपास करावा,अशी मागणी होत आहे.