एकाच कुटुंबातील पाच जणांनी घेतली फाशी

आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा संशयपाटणा : बिहारमधील सुपौल जिल्ह्यात एका गरीब कुटुंबातील पाच जणांनी आर्थिक विवंचनेतून गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी व दोन अल्पवयीन मुली व एका मुलाचा समावेश आहे. घटनेबाबत राघोपूर गावातील ग्रामस्थांनी सांगितले की, मिश्री लाल यांचे कुटुंब गेल्या दोन- अडीच वर्षांपासून आर्थिक विवंचनेत होते. मिश्री लाल कोळसा …
 

आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा संशय
पाटणा : बिहारमधील सुपौल जिल्ह्यात एका गरीब कुटुंबातील पाच जणांनी आर्थिक विवंचनेतून गळाफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी व दोन अल्पवयीन मुली व एका मुलाचा समावेश आहे. घटनेबाबत राघोपूर गावातील ग्रामस्थांनी सांगितले की, मिश्री लाल यांचे कुटुंब गेल्या दोन- अडीच वर्षांपासून आर्थिक विवंचनेत होते. मिश्री लाल कोळसा विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गरीबीमुळे त्यांना त्यांची वडिलोपार्जित जमीनही विकावी लागली होती. गेल्या काही दिवसांपासून कुटुंबाने गावाशी असलेले संबंध तोडले होते व ते एकाकी राहत होते. तसेच गेल्या तीन चार दिवसांपासून या कुटुंबातील कुणीच व्यक्ती बाहेर आल्याचे आढळले नाही. त्यामुळे गावप्रमुखांनी पोलिसांना माहिती कळवली. तेव्हा हा सामुहिक आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. घरात पाच ही जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.