एकत्र बेडरूममध्ये झोपूनही नवरा देत नाही शरीरसुख!; महिलेची पोलिसांत धाव

अहमदाबाद : नवरा शरीरसुख देत नाही. शारीरिक संबंध ठेवायची त्याची इच्छा होत नाही, अशी तक्रार एका नवविवाहितेने पोलीस ठाण्यात दिली आहे. अहमदाबाद जिल्ह्यातील दानी लिमडा शहरात हा प्रकार समोर आला आहे. नवऱ्याचे वय २५ तर तक्रारदार विवाहितेचे वय २३ वर्षे आहे. दोघांचेही फेब्रुवारी २०२१ मध्ये लग्न झाले होते. विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या नवऱ्याने फक्त सुरुवातीचे …
 
एकत्र बेडरूममध्ये झोपूनही नवरा देत नाही शरीरसुख!; महिलेची पोलिसांत धाव

अहमदाबाद : नवरा शरीरसुख देत नाही. शारीरिक संबंध ठेवायची त्याची इच्छा होत नाही, अशी तक्रार एका नवविवाहितेने पोलीस ठाण्यात दिली आहे. अहमदाबाद जिल्ह्यातील दानी लिमडा शहरात हा प्रकार समोर आला आहे.

नवऱ्याचे वय २५ तर तक्रारदार विवाहितेचे वय २३ वर्षे आहे. दोघांचेही फेब्रुवारी २०२१ मध्ये लग्न झाले होते. विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या नवऱ्याने फक्त सुरुवातीचे १० दिवस कसेबसे शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर त्याने सतत शारीरिक सुखापासून वंचित ठेवले. एकत्र बेडरूममध्ये झोपूनही तो काहीच करत नाही. शारीरिक सुखाची मागणी केल्यावर तो मारहाण करतो. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात विवाहिता माहेरी गेली. नवऱ्याविरोधात तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. हे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.