उत्तर प्रदेशात मायावती घेणार ब्राह्मणांचे मेळावे!

लखनौ ः दलित मतं हा ज्या पक्षाचा पाया होता. दलित- मुस्लिमांच्या मतांवर ज्यांची भिस्त होती. त्या मायावती यांनी पुन्हा आता बेरजेचं राजकारण सुरू केलं आहे. अयोध्येपासून राज्यभर ब्राम्हणांचे मेळावे घेतले जाणार आहेत. पुढच्या आठ महिन्यांत उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्षानं तयारी सुरू केली आहे. आता त्यात मायावती यांच्या बहुजन …
 

लखनौ ः दलित मतं हा ज्या पक्षाचा पाया होता. दलित- मुस्लिमांच्या मतांवर ज्यांची भिस्त होती. त्या मायावती यांनी पुन्हा आता बेरजेचं राजकारण सुरू केलं आहे. अयोध्येपासून राज्यभर ब्राम्हणांचे मेळावे घेतले जाणार आहेत.

पुढच्या आठ महिन्यांत उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजप, काँग्रेस, समाजवादी पक्षानं तयारी सुरू केली आहे. आता त्यात मायावती यांच्या बहुजन समाज पक्षानं ही विधानसभेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

पूर्वीही मायावती यांनी हाथी, विष्णू, गणेशची घोषणा केली होती. आता त्याच मार्गावरून मायावती पुन्हा निघाल्या आहेत. बहुजन समाज पक्षाकडून २३ जुलैरोजी अयोध्येतून विशेष मोहीम सुरू करण्यात येत आहे. ब्राह्मण समाजाच्या मेळाव्यामागची भूमिका विशद करताना मायावती म्हणाल्या, की आगामी निवडणुकीत ब्राह्मण समाज भाजपला मतदान करणार नाही. सतीश मिश्रा हे ब्राह्मण समाजाचे नेते मायावती यांच्यासोबत आहेत. पक्षाचे ते सरचिटणीस आहेत. मायावती यांनी त्यांच्यावरच ब्राह्मण समाजाला बहुजन समाजाशी जोडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ब्राह्मण समाजाचं ही बहुजन समाजासोबत राहण्यात हीत आहे. हे त्यांना पटवून देण्यासाठी मोहीम सुरू केली जाणार आहे.