इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी आरिज खानला मरेपर्यंत फाशी

बाटला हाऊस चकमक प्रकरण; दिल्लीच्या कोर्टाचा निकालनवी दिल्ली : नवी दिल्ली येथे २००८ मध्ये घडलेल्या बाटला हाऊस एन्काउंटर व शहीद इन्स्पेक्टर मोहनचंद शर्मा यांच्या हत्याप्रकरणी दिल्लीच्या साकेत न्यायालयाने इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित दहशतवादी आरिज खान याला सोमवारी दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने हा गुन्हा रेअरेस्ट ऑफ रेअर असल्याचे स्पष्ट करत आरोपीला फाशीची शिक्षा …
 

बाटला हाऊस चकमक प्रकरण; दिल्लीच्या कोर्टाचा निकाल
नवी दिल्ली : नवी दिल्ली येथे २००८ मध्ये घडलेल्या बाटला हाऊस एन्काउंटर व शहीद इन्स्पेक्टर मोहनचंद शर्मा यांच्या हत्याप्रकरणी दिल्लीच्या साकेत न्यायालयाने इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित दहशतवादी आरिज खान याला सोमवारी दोषी ठरवत मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने हा गुन्हा रेअरेस्ट ऑफ रेअर असल्याचे स्पष्ट करत आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली. तसेच त्याच्यावर ११ लाखांचा दंड ठोठावला असून दंडातील दहा लाख रुपयांची रक्कम शहीद इन्स्पेक्टर मोहनचंद शर्मा यांच्या कुटुंबियांना देण्याचे आदेशही दिले आहेत.
साकेत न्यायालयाने बाटला हाऊस प्रकरणात आरिज खान याला दोषी ठरवले होते व त्याच्या शिक्षेसाठी १५ मार्च ही तारीख निश्चित केली होती. प्रकरणाच्या तपासात आरिज खान हा इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले होते. पोलिसांनी त्याला मृत्यूदंड देण्याची मागणी केली होती.तर आरिज खानच्या वकिलांनी त्याला सौम्य शिक्षा देण्याची मागणी केली होती. याचप्रकरणात दिल्लीच्या एका न्यायालयाने २०१३ मध्ये आणखी एक आरोपी व इंडियन मुजाहिद्दीनचा आरोपी शहजाद अहमद याला आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. २००८ मध्ये दक्षिण दिल्लीतील जामियानगर भागात दहशवाद्यांसोबत दिल्ली पोलिसांची चकमक झाली होती. त्यावेळी दहशतवाद्यांच्या गोळीबारात इन्स्पेक्टर मोहनचंद शर्मा यांचा मृत्यू झाला होता. चकमकीनंतर आरिज खान हा फरार झाला होता.