अशोक गहलोत यांनीच केले सचिन पायलट यांचे फोन टॅप

विरोधकांनी केली राजीनाम्याची मागणी; राजस्थानात ‘राज‘कीय पेचजयपूर : राजस्थानात अशोक गहलोत सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. सचिन पायलट यांनी जेव्हा बंडखोरी केली तेव्हा मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी त्यांचे फोन टॅप करण्याचे आदेश दिले होते. भाजपने हे प्रकरण उजेडात आणत त्यावर तारांकीत प्रश्न उपस्थित केल्यानंतर गहलोत यांनी विधिमंडळात त्याची कबुली दिली. पण आता विरोधकांनी त्यांच्या …
 

विरोधकांनी केली राजीनाम्याची मागणी; राजस्थानात ‘राज‘कीय पेच
जयपूर :
राजस्थानात अशोक गहलोत सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. सचिन पायलट यांनी जेव्हा बंडखोरी केली तेव्हा मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी त्यांचे फोन टॅप करण्याचे आदेश दिले होते. भाजपने हे प्रकरण उजेडात आणत त्यावर तारांकीत प्रश्न उपस्थित केल्यानंतर गहलोत यांनी विधिमंडळात त्याची कबुली दिली. पण आता विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचा आग्रह धरला आहे. दुसरीकडे गहलोत यांच्या आदेशानेच फोन टॅपिंग झाल्याचे स्पष्ट झाल्याने सचिन पायलट यांचा गट अस्वस्थ झाला आहे. मुख्यमंत्री गहलोत हेच राज्यात गृहमंत्रीदेखील आहेत.असे वाटत आहे की, मुख्यमंत्री त्यांना असुरक्षित समजत होते, त्यांची नियत साफ नव्हती. ही एकप्रकारे लोकशाची हत्या असून व्यक्तिस्वातत्र्याची गळचेपी आहे. त्यामुळे याची जबाबादारी स्वीकारून त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी केली.गेल्यावर्षी सचिन पायलट यांच्या नेतृत्वात १८ काँग्रेस आमदारांनी बंडखोरी केली होती. गहलोत यांनी जोरदार फिल्डिंग लावून सर्व आमदारांना माघारी फिरवले. पायलट एकाकी पडले व ते बंड फसले होते.पण त्यासाठी गहलोत यांनी पायलट यांच्यासह आमदारांचे फोन टॅप करायला लावल्याचे स्पष्ट झाले आहे.