अजब गजब… एका वर्षात दोनदा गर्भवती; १० महिन्यांत तीन बाळांना जन्म

न्यूयॉर्क ः काहीवेळा जुळे, तिळे किंवा चार बाळांचा जन्म झाल्याची उदाहरणे आहेत. मात्र अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जगावेगळी घटना समोर आली आहे. त्यामुळे महिलेची प्रसुती करणारे डॉक्टरसुद्धा चक्रावून गेले आहेत. एक २३ वर्षीय महिला एका वर्षात दोनदा गर्भवती राहिली आणि केवळ दहा महिन्यांत तिने तीन बाळांना जन्म दिला. शॅरना स्मिथ असं या महिलेचं नाव आहे. ६ …
 
अजब गजब… एका वर्षात दोनदा गर्भवती; १० महिन्यांत तीन बाळांना जन्म

न्‍यूयॉर्क ः काहीवेळा जुळे, तिळे किंवा चार बाळांचा जन्म झाल्याची उदाहरणे आहेत. मात्र अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जगावेगळी घटना समोर आली आहे. त्यामुळे महिलेची प्रसुती करणारे डॉक्टरसुद्धा चक्रावून गेले आहेत.

एक २३ वर्षीय महिला एका वर्षात दोनदा गर्भवती राहिली आणि केवळ दहा महिन्यांत तिने तीन बाळांना जन्म दिला. शॅरना स्मिथ असं या महिलेचं नाव आहे. ६ जानेवारी २०२० ला तिने एक गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर ती पुन्हा लगेच गरोदर राहिली आणि ३० ऑक्टोबर २०२० ला तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. अशा तऱ्हेने तिने १० महिन्यांतच ३ मुलांना जन्म दिला. तिचे तिन्ही मुलं ठणठणीत आहेत. मात्र नवऱ्यासोबत तिचा घटस्फोट झाला आहे.