अंधाराने केला घोटाळा… पती समजून भलत्याच तरुणासोबत शरीरसंबंध!; “या’ शहरात घडली घटना

मऊगंज (मध्यप्रदेश) ः अंधारात पती समजून भलत्याच तरुणासोबत २७ वर्षीय विवाहितेने शरीरसंबंध ठेवल्याचा प्रकार मध्यप्रदेशातील मऊगंजमध्ये समोर आला आहे. महिलेने पोलिसांत तक्रार दिली असली तरी, एकूण घटना किचकट आणि अनेक प्रश्न निर्माण करणारी असल्याने तपासाअंतीच पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत. शरीरसंबंध ठेवणारा तरुण पसार झाला आहे. झाले असे, की दोन दिवसांपूर्वी पीडित विवाहिता घरात पती …
 
अंधाराने केला घोटाळा… पती समजून भलत्याच तरुणासोबत शरीरसंबंध!; “या’ शहरात घडली घटना

मऊगंज (मध्यप्रदेश) ः अंधारात पती समजून भलत्याच तरुणासोबत २७ वर्षीय विवाहितेने शरीरसंबंध ठेवल्याचा प्रकार मध्यप्रदेशातील मऊगंजमध्ये समोर आला आहे. महिलेने पोलिसांत तक्रार दिली असली तरी, एकूण घटना किचकट आणि अनेक प्रश्न निर्माण करणारी असल्याने तपासाअंतीच पोलीस गुन्‍हा दाखल करणार आहेत. शरीरसंबंध ठेवणारा तरुण पसार झाला आहे.

झाले असे, की दोन दिवसांपूर्वी पीडित विवाहिता घरात पती आणि पाच वर्षीय मुलासोबत झोपलेली होती. मध्यरात्री शेजारील तरुण (गुन्‍हा दाखल होईपर्यंत नाव जाहीर करण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.) तिच्‍या घरात घुसला. तिच्‍या बाजूलाच तो झोपला आणि तिच्‍याशी शरीरसंबंध प्रस्‍थापित केले. पतीच असल्याचे समजून तिने विरोध केला नाही.

हे सर्व सुरू असताना पती दुसऱ्या बाजूला झाेपलेला असल्याचे तिच्‍या लक्षात आले. तिने उठून तरुणाला विरोध केला असता तो हाताला झटका देऊन पळून गेला. तक्रारीनंतर पोलिसांनी घटनास्‍थळी भेट दिली. विशेष म्‍हणजे तिच्‍या बाजूलाच तिचा नवराही झोपलेला होता. त्‍यामुळे त्‍याला कसे कळले नाही, हा प्रश्नच आहे. तूर्त पोलिसांनी तक्रार लिहून घेतली आहे. तपास महिला पोलीस अधिकाऱ्याकडे सोपवला असून, चौकशीअंती गुन्‍हा दाखल हाेणार आहे, अशी माहिती मऊगंज ठाण्याचे एएसपी विजय डाबर यांनी दिली.