National News : नवरा म्हणतो, बायको अंघोळ करत नाही, मला वास येतो; तलाक हवाय!
अलीगढ : उत्तरप्रदेशातील अलीगढमध्ये नवरा- बायकोचं वेगळंच भांडण समोर आलं आहे. बायकोला तलाक देण्याचा तयारीत नवरा आहे. सततच्या छळाला कंटाळून तिने याप्रकरणाची तक्रार महिला संरक्षण कक्षाकडे केली. समुपदेशन करण्यासाठी कक्षाने या जोडप्याला बोलावले. तेव्हा नवऱ्याने केलेली तक्रार एेकून सगळेच थक्क झाले. बायकोकडून मिळणाऱ्या त्रासाबद्दल नवऱ्याने समुपदेशकाला सांगितले. ती अंघोळ करत नाही. त्यामुळे तिच्या अंगाचा घाण …
Sep 23, 2021, 12:57 IST
अलीगढ : उत्तरप्रदेशातील अलीगढमध्ये नवरा- बायकोचं वेगळंच भांडण समोर आलं आहे. बायकोला तलाक देण्याचा तयारीत नवरा आहे. सततच्या छळाला कंटाळून तिने याप्रकरणाची तक्रार महिला संरक्षण कक्षाकडे केली.
समुपदेशन करण्यासाठी कक्षाने या जोडप्याला बोलावले. तेव्हा नवऱ्याने केलेली तक्रार एेकून सगळेच थक्क झाले. बायकोकडून मिळणाऱ्या त्रासाबद्दल नवऱ्याने समुपदेशकाला सांगितले. ती अंघोळ करत नाही. त्यामुळे तिच्या अंगाचा घाण येतो. तिच्यासोबत राहणे अवघड आहे. प्लिज मला तलाक हवाय… असा नवरा म्हणाला.त्यामुळे समुपदेशकसुद्धा हैराण झालेत. बायकोने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्याला माझ्यासोबत राहायचं नाही. त्यामुळेच तो खोटे -नाटे आरोप करतोय, असं त्याच्या पत्नीचं म्हणणं आहे.