National news : आश्चर्यम्‌… नदीत आढळला ७ किलो वजनाचा तरंगता दगड!

वडोदरा : गुजरात राज्यातील वडोदरा गावाजवळ वाहणाऱ्या नदीत तब्बल ७ किलो वजनाचा तरंगता दगड आढळला आहे. हा दगड पाण्यात बुडत नसल्याने तो रामसेतूतून तुटून वाहत आला असावा, अशी स्थानिक नागरिकांची श्रद्धा आहे. गावातील काही युवक मासेमारी करण्यासाठी नदीपात्रात बोट घेऊन गेले होते. त्यांना पाण्यात तरंगणारी वस्तू दिसली. सुरुवातीला युवकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र काम संपवून …
 
National news : आश्चर्यम्‌… नदीत आढळला ७ किलो वजनाचा तरंगता दगड!

वडोदरा : गुजरात राज्यातील वडोदरा गावाजवळ वाहणाऱ्या नदीत तब्बल ७ किलो वजनाचा तरंगता दगड आढळला आहे. हा दगड पाण्यात बुडत नसल्याने तो रामसेतूतून तुटून वाहत आला असावा, अशी स्थानिक नागरिकांची श्रद्धा आहे.

गावातील काही युवक मासेमारी करण्यासाठी नदीपात्रात बोट घेऊन गेले होते. त्यांना पाण्यात तरंगणारी वस्तू दिसली. सुरुवातीला युवकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र काम संपवून परतले तरी ती वस्तू युवकांना तिथेच तरंगताना दिसून आली. युवकांनी ती वस्तू पाण्याबाहेर काढली असता तब्बल ७ किलो वजनाचा दगड असल्याचे त्यांच्या लक्षात आले. युवकांना आश्चर्य वाटल्याने तो दगड त्यांनी गावकऱ्यांना दाखवला. गावकऱ्यांना सुद्धा याचे आश्चर्य वाटले.

वैज्ञानिक म्हणतात, चमत्कार नाही…
काही विशिष्ट प्रकारचे दगड पाण्यावर तंरगणे ही सामान्य बाब आहे. काही ज्वालामुखीतून निघालेले दगड, चुन्याचे दगड किंवा कोरल्स स्टोन वजनदार असतात. मात्र त्यांची घनता कमी असते. त्यामुळे पाण्यात ते हलके असतात. त्यामुळे त्याच्या छिद्रात हवा भरल्याने ते पाण्यावर तरंगतात. यात कोणताही चमत्कार नाही, असे एमएस विद्यापीठाचे निवृत्त प्रोफेसर व वैज्ञानिक के. सी. तिवारी यांनी सांगितले.