NATIONAL NEWS : आयुष्यभर कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या; मृत्यूनंतर २१ महिन्यांनी न्यायालयाने केले निर्दोष मुक्त!

रायपूर ः शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. लोक असं का म्हणत असतील ते ही बातमी वाचून आपल्याही लक्षात येईल. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी एक व्यक्ती आयुष्यभर कोर्टाच्या पायऱ्या झिजवत राहिला. शेवटी त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर २१ महिन्यांनी उच्च न्यायालयाने त्याला निर्दोष घोषित केले. मात्र हा निकाल ऐकायला तो जिवंत नव्हता. छत्तीसगढ राज्यातील …
 
NATIONAL NEWS : आयुष्यभर कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्या; मृत्यूनंतर २१ महिन्यांनी न्यायालयाने केले निर्दोष मुक्त!

रायपूर ः शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. लोक असं का म्हणत असतील ते ही बातमी वाचून आपल्याही लक्षात येईल. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी एक व्यक्ती आयुष्यभर कोर्टाच्या पायऱ्या झिजवत राहिला. शेवटी त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर २१ महिन्यांनी उच्च न्यायालयाने त्याला निर्दोष घोषित केले. मात्र हा निकाल ऐकायला तो जिवंत नव्हता.

छत्तीसगढ राज्यातील दुर्ग जिल्ह्यात फॉरेस्ट बिट गार्ड म्हणून शिवप्रसाद काम करीत होते. जंगल परिसरात लाकूड चोरी होत असल्याची माहिती मिळताच शिवप्रसाद घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लाकडे जप्त केली. मात्र ज्याच्यावर लाकूड चोरीचा आरोप होता, त्यानेच शिवप्रसाद यांनी १ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला. विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने शिवप्रसाद यांना दोषी ठरवून त्यांचे निलंबन केले. २००३ मध्ये निर्णयाला त्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. तेव्हापासून उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. दरम्यानच्या काळात नोकरी गमवावी लागल्याने शिवप्रसाद कुटूंबियांवर हलाखीचे जीवन जगण्याची वेळ आली होती. अनेकदा वकिलांची फी देण्यासाठी त्यांना उसने पैसे घ्यावे लागले. न्यायाची प्रतीक्षा करत असताना डिसेंबर २०१९ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. नोकरी पुन्हा नाही मिळाली तरी चालेल पण स्वतःवरील भ्रष्टचाराचा डाग त्यांना पुसायचा होता. मात्र जिवंतपणी त्यांना स्वतःवरील भ्रष्टाचाराचा कलंक पुसता आला नाही. सर्व युक्तिवाद ऐकून सप्टेंबर २०२१ मध्ये उच्च न्यायाल्याने त्यांना निर्दोष मुक्त केले. मात्र हा आनंददायी निर्णय ऐकायला ते जिवंत नव्हते.