National News : सासऱ्याचा सुनेवर लैंगिक अत्याचार!; तिने नवऱ्याकडे तक्रार केली तर नवरा म्हणाला, कोई बात नहीं,अपने तो हैं..!
लखनौ : नवविवाहित सुनेवर सासऱ्याने जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. जेव्हा तिने नवऱ्याला ही गोष्ट सांगितली तेव्हा नवऱ्याने तिला गप्प राहायला सांगितले. झाले तर काय झाले ते आपलेच तर आहेत… असं म्हणत नवऱ्याने तिलाच दमदाटी केली. उत्तरप्रदेशातील हापुडा जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी ही घटना समोर आली आहे.
पीडित नवविवाहितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिच्या नवऱ्यासह सासरा व सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, यावर्षी मार्चमध्ये तिचे लग्न नसिरूद्दीनसोबत झाले होते. सासरचे लोक तिचा हुंड्यासाठी छळ करू लागले. दोन लाख रुपये माहेरवरून घेऊन ये, अशी मागणी सासरचे लोक करत होते. तिच्या सासऱ्याची तिच्यावर वाईट नजर पडली. तिचा पती घरी नसताना सासरा तिच्याशी लगट करायचा, असे तिने तक्रारीत म्हटले आहे.
एक दिवस पती घरी नसताना सासऱ्याने तिला खोलीत ओढले व तिच्यावर जबरदस्ती लैंगिक अत्याचार केला. नवरा घरी आल्यानंतर तिने ही बाब नवऱ्याला सांगितली असता,”कुछ बात नहीं,वो अपने तो हैं’, असे म्हणत कुणाला न सांगण्याची धमकी दिली. त्यानंतर सासरच्यांनी तिला बेदम मारहाण करून तलाक तलाक तलाक असे म्हणत घराबाहेर हाकलले. तिने माहेरच्या मंडळींना आपबिती सांगितली. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पीडितेचा नवरा नसिरुद्दीन, सासरा मोहम्मद उमर व सासू सिबा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.