NATIONAL NEWS : ओवेसी माझा बालमित्र; मोहन भागवत माझे मामा!…रविवारची सुटी मिळवण्यासाठी इंजिनिअरने बॉसला लिहिले पत्र!

इंदौर : मध्य प्रदेशातील सुसनेर येथील नगर परिषदेत इंजिनिअर असणाऱ्या एका अभियंत्याने रविवारच्या सुटीसाठी मुख्याधिकाऱ्यांना एक पत्र लिहिले. ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवारी सुद्धा या इंजिनिअरला कामावर बोलावले जात होते. त्यामुळे त्याने एक भन्नाट शक्कल लढवली. मात्र मुख्याधिकाऱ्यांनीसुद्धा पत्राला तितकेच भन्नाट उत्तर देऊन रविवारी कामाला यावेच लागेल, असा आदेश दिलाय. आज तक …
 
NATIONAL NEWS : ओवेसी माझा बालमित्र; मोहन भागवत माझे मामा!…रविवारची सुटी मिळवण्यासाठी इंजिनिअरने बॉसला लिहिले पत्र!

इंदौर : मध्य प्रदेशातील सुसनेर येथील नगर परिषदेत इंजिनिअर असणाऱ्या एका अभियंत्याने रविवारच्या सुटीसाठी मुख्याधिकाऱ्यांना एक पत्र लिहिले. ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रविवारी सुद्धा या इंजिनिअरला कामावर बोलावले जात होते. त्यामुळे त्याने एक भन्नाट शक्कल लढवली. मात्र मुख्याधिकाऱ्यांनीसुद्धा पत्राला तितकेच भन्नाट उत्तर देऊन रविवारी कामाला यावेच लागेल, असा आदेश दिलाय. आज तक या वृत्त वाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.

रविवारी मी कामाला येऊ शकत नाही. आत्मा अमर असल्याचा मला साक्षात्कार झाला आहे. माझ्या मागील जन्माची माहिती मला कळाली आहे. मागच्या जन्मात ओवेसी हे माझे बालमित्र होते तर सरसंघचालक मोहन भागवत माझे मामा होते. त्यामुळे माझ्या जन्माबाबत अधिक जाणून घेण्यासाठी मला गीता अभ्यासायची आहे. माझ्यातील अहंकार दूर करण्यासाठी मला घरोघरी जाऊन भीक मागायची असल्याने मला रविवारची सुटी पाहिजेच, असे या इंजिनिअरने पत्रात म्हटले आहे. त्‍यावर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा भन्नाट उत्तर दिले. ते म्हणाले, की तुम्ही तुमचा अहंकार दूर करू इच्छिता ही आनंदाची गोष्ट आहे. यामध्ये आम्ही निश्चित सहकार्य करू. अहंकारी व्यक्तीला रविवार आपल्या इच्छेनुसार घालवावा असे वाटत असते. अहंकार घालवण्याची तुमची अध्यात्मिक इच्छा बघून प्रत्येक रविवारी तुम्ही कार्यालयात उपस्थित राहून काम करावे, असा आदेश देण्यात येत आहे. तुमच्या अध्यात्मिक प्रगतीसाठी साधक बनता येत असल्याने मला समाधान वाटत आहे, असे उत्तर मुख्याधिकाऱ्यांनी पत्राला दिले आहे.