National Crime : पार्टीहून परतताना तरुणीवर दोघांचा सामूहिक बलात्‍कार!; जयपूर हादरले

जयपूर ः भांडण झाल्याने हायवेवर मित्र सोडून गेल्याची संधी साधून तरुणीला दोघांनी कारमध्ये खेचून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये घडली आहे. घटनेनंतर तरुणीने भांकरोटा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तिला रुग्णालयात दाखल करून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे. पीडित 22 वर्षीय तरुणी मित्रांसह जयपूरच्या सी स्कीममधील अहिंसा सर्कलजवळील एका …
 

जयपूर ः भांडण झाल्‍याने हायवेवर मित्र सोडून गेल्याची संधी साधून तरुणीला दोघांनी कारमध्ये खेचून सामूहिक बलात्‍कार केल्याची धक्‍कादायक घटना राजस्‍थानची राजधानी जयपूरमध्ये घडली आहे. घटनेनंतर तरुणीने भांकरोटा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तिला रुग्‍णालयात दाखल करून आरोपींविरुद्ध गुन्‍हा दाखल करत त्‍यांचा शोध सुरू केला आहे.

पीडित 22 वर्षीय तरुणी मित्रांसह जयपूरच्‍या सी स्कीममधील अहिंसा सर्कलजवळील एका हॉटेलमध्ये रविवारी रात्री पार्टीसाठी गेली होती. मध्यरात्री अडीचच्‍या सुमारास रक्षित नावाच्‍या मित्रासोबत ती भांकरोटाच्‍या दिशेने निघाली. मात्र मध्येच बायपासवर दोघांमध्ये भांडण झाले. त्‍यानंतर रक्षित तिला हायवेवरच सोडून निघून गेला. दोघांचे भांडण सुरू असताना दोन तरुण ते पाहत होते.

रक्षित निघून गेल्यानंतर त्‍यांनी कार तिच्‍याकडे नेऊन तिला लिफ्ट देण्याच्‍या बहाण्याने कारमध्ये बसवले. त्‍यानंतर एका निर्जनस्‍थळी नेऊन तिच्‍यावर सामूहिक बलात्‍कार केला. नंतर ते तिला तिथेच सोडून पसार झाले. घटनेनंतर पीडितेने तेथील रहिवाशांच्‍या मदतीने भांकरोटा पोलीस ठाणे गाठले.