International News : हिंदू मुलीने पाकिस्तानमध्ये रचला इतिहास; सर्वांत कठीण परीक्षा पास होऊन झाली वरिष्ठ अधिकारी!
पाकिस्तानच्या सर्वात अवघड प्रशासकीय परीक्षेत उत्तीर्ण होऊन एका हिंदू मुलीने इतिहास रचला आहे. डॉ. सना रामचंद्र गुलवानी (२७) असे या मुलीचे नाव आहे. भारतात यूपीएससीला सर्वात अवघड परीक्षा मानले जाते. यूपीएससी उत्तीर्ण होणाऱ्यांना भारताच्या प्रशासकीय सेवेत समाविष्ट केले जाते. त्याचप्रमाणे पाकिस्तानात सेंट्रल सुपीरिअर सर्व्हिसेस (CSS) ही परीक्षा सर्वात कठीण समजली जाते. केवळ २ टक्के परीक्षार्थी …
Sep 21, 2021, 18:58 IST
पाकिस्तानच्या सर्वात अवघड प्रशासकीय परीक्षेत उत्तीर्ण होऊन एका हिंदू मुलीने इतिहास रचला आहे. डॉ. सना रामचंद्र गुलवानी (२७) असे या मुलीचे नाव आहे. भारतात यूपीएससीला सर्वात अवघड परीक्षा मानले जाते. यूपीएससी उत्तीर्ण होणाऱ्यांना भारताच्या प्रशासकीय सेवेत समाविष्ट केले जाते. त्याचप्रमाणे पाकिस्तानात सेंट्रल सुपीरिअर सर्व्हिसेस (CSS) ही परीक्षा सर्वात कठीण समजली जाते. केवळ २ टक्के परीक्षार्थी या परीक्षेत उत्तीर्ण होत असतात. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना पाकिस्तानच्या प्रशासकीय सेवेत समाविष्ट केले जाते. पाकिस्तानच्या इतिहासात हिंदू मुलीने या परीक्षेत यश मिळविण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे.