INTERNATIONAL NEWS : धारदार चाकूने स्वतःच गुप्तांग कापून टाकलं!
लंडन : एका ४५ वर्षीय व्यक्तीने धारदार चाकूने स्वतःच गुप्तांग कापून टाकल्याची धक्कादायक घटना केनियात समोर आली आहे. मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या या व्यक्तीने गेल्या काही दिवसांपासूनऔषधी घेणे बंद केले होते.
गुप्तांग कापल्यानंतर रक्तस्त्राव सुरू झाला. सुरुवातीला त्याच्या घरच्यांना नेमकं काय झालं हेच कळत नव्हतं. मात्र बाजूला पडलेल्या लिंगावरून त्याने त्याचे लिंग कापल्याचे घरच्यांच्या लक्षात आले. त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. हे दृश्य पाहून डॉक्टरही हादरले. डॉक्टरांनी पुन्हा लिंग जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र लिंग कापून बराच वेळ झाल्याने ऑपरेशन यशस्वी झाले नाही. शेवटी डॉक्टरांनी गुप्तांगाची जागा स्वच्छ करून रक्तस्त्राव थांबवला व व्यक्तीचा जीव वाचवला. त्याला पुढील आयुष्य मात्र गुप्तांगाविना घालवावे लागणार आहे. विवाहानंतर तो लैंगिक संबंध ठेवण्यात कमी पडत होता. त्याला मुलबाळ सुद्धा होत नव्हते. म्हणून नैराश्यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे डॉक्टरांनी सांगितले. केनियाच्या एका मेडिकल जर्नलमध्ये ही घटना प्रकाशित करण्यात आली आहे. मात्र व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.