19 वर्षीय तरुणाला “लिव्ह इन’ मध्ये राहण्याचा अधिकार

नवी दिल्ली ः तरुणासाठी विवाहाचे वय २१ आणि तरुणीसाठी १८ हा आपला कायदा असला, तरी कायद्यात बऱ्याचदा संदिग्धता असते. त्याचा निकाल मग आश्चर्यकारक लागतो. असाच निकाल पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. तरुण- तरुणी सज्ञान असल्याचा आधार घेत त्यांना लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचा हा …
 

नवी दिल्ली ः तरुणासाठी विवाहाचे वय २१ आणि तरुणीसाठी १८ हा आपला कायदा असला, तरी कायद्यात बऱ्याचदा संदिग्धता असते. त्याचा निकाल मग आश्चर्यकारक लागतो. असाच निकाल पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने दिला आहे. तरुण- तरुणी सज्ञान असल्याचा आधार घेत त्यांना लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाचा हा निर्णय सध्या चर्चेत आहे. या प्रकरणातील तरुणाचे वय १९ वर्षे आणि तरुणीचे वय २१ आहे. या तरुणाला महिला पार्टनरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा अधिकार असल्याचं असून त्यांना सुरक्षा देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. १८ वर्षांहून अधिक वय असल्यानं हा तरुण सज्ञान आहे. विवाहासाठी मात्र त्याचं वय वैध नाही; मात्र या आधारावर त्याला आपल्या सहचाराच्या निर्णयापासून वंचित ठेवलं जावू शकत नाही, असं उच्च न्यायालयानं म्हटलंय. उच्च न्यायालयाच्या एकल पीठाचे न्यायमूर्ती अरुण कुमार त्यागी यांनी हा निर्णय दिला. याचिकाकर्त्या तरुणानं आपल्या महिला पार्टनरच्या कुटुंबीयांकडून दोघांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं. यासंबंधी मोहाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. यावर,न्यायालयानं तरुणाला जीवनाची सुरक्षा आणि स्वातंत्र्यांतर्गत युगुलाला योग्य सुरक्षा पुरविण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. तरुणीच्या कुटुंबीयांकडून तिच्यावर दुसऱ्या व्यक्तीसोबत विवाहाची जबरदस्ती केली जात आहे. तरुण- तरुणीला जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली, असं या जोडप्याचं म्हणणं आहे.