२००० च्या नोटा बंद होणार नाहीत; पण मिळणारही नाहीत

सरकारच्या उत्तरामुळे संसदेत खुलासानवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही एटीएम किंवा बाजारपेठेत २००० रुपयांची नोट कुणाच्याच दृष्टीस पडत नव्हती. त्यामुळे सरकार पुन्हा एकदा नोटबंदी लागू करून २०००च्या नोटा बंद करणार की काय? अशी अफवा जोर धरू लागली होती. या पार्श्वभूमीवर काही खासदारांनी सरकारला संसदेत प्रश्न विचारून त्या नोटेबाबत स्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली होती. …
 

सरकारच्या उत्तरामुळे संसदेत खुलासा
नवी दिल्ली
: गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही एटीएम किंवा बाजारपेठेत २००० रुपयांची नोट कुणाच्याच दृष्टीस पडत नव्हती. त्यामुळे सरकार पुन्हा एकदा नोटबंदी लागू करून २०००च्या नोटा बंद करणार की काय? अशी अफवा जोर धरू लागली होती. या पार्श्वभूमीवर काही खासदारांनी सरकारला संसदेत प्रश्न विचारून त्या नोटेबाबत स्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली होती. त्यावर सरकारने सांगितले की, गेल्या २ वर्षात २००० रुपयांची एकही नवी नोट छापली नाही. त्यामुळे त्यांच्या संख्येत घट झाली आहे.अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ३० मार्च २०१८ ला २००० रुपयांच्या ३३६.२ कोटी मूल्याच्या नोटा चलनात आल्या होत्या.परंतु २६ फेब्रुवारी २०२१ मध्ये याची संख्या २४९.९ कोटी इतकीच राहिली. कोणत्या नोटांची छपाई किती करायची हे आरबीआयच्या सल्ल्यानेच ठरवले जाते.या नोटा लोकांनी संग्रह करून ठेवल्या आहेत. त्यामुळे काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी म्हणून सरकारने २००० च्या नोटेची छपाई थांबवली आहे.