विदेशी महिलेवर बलात्कार; दोघांना फाशी

लाहोर : गाडी बंद पडल्याने आडमार्गावर थांबलेल्या विदेशी महिलेवर तिच्या मुलांसमोरच पाशवी अत्याचार करणार्या दोन आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्याचा महत्वपूर्ण निकाल पाकिस्तानात दहशतवादविरोधी न्यायालयाने दिला आहे. पाकिस्तानात लाहोर- सियालकोट मार्गावर सप्टेंबर २०२०मध्ये एका प्रâान्सच्या महिलेची गाडी बंद पडली होती. ही महिला पाकिस्तानात पर्यटनासाठी गेली होती. त्यावेळी तिच्या असहाय परिस्थितीचा फायदा घेत आबिद मलाही व शफाकत …
 


लाहोर : गाडी बंद पडल्याने आडमार्गावर थांबलेल्या विदेशी महिलेवर तिच्या मुलांसमोरच पाशवी अत्याचार करणार्‍या दोन आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्याचा महत्वपूर्ण निकाल पाकिस्तानात दहशतवादविरोधी न्यायालयाने दिला आहे. पाकिस्तानात लाहोर- सियालकोट मार्गावर सप्टेंबर २०२०मध्ये एका प्रâान्सच्या महिलेची गाडी बंद पडली होती. ही महिला पाकिस्तानात पर्यटनासाठी गेली होती. त्यावेळी तिच्या असहाय परिस्थितीचा फायदा घेत आबिद मलाही व शफाकत अहमद यांनी तिच्या मुलादेखत त्या महिलेवर पाशवी अत्याचार केला. या घटनेनंतर पाकिस्तानात महिला संघटनांनी तीव्र निदर्शने केली होती. तसेच बलात्कारी आरोपींना भर चौकात फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी केली होती. न्यायालयात डीएनए चाचणीद्वारे आरोपींवरील बलात्कारचा गुन्हा सिद्ध झाला. त्यानंतर दहशतवादविरोधी न्यायालयात खटला चालवण्यात येऊन न्यायालयाने दोघांनाही मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे.