लोकसभा सभापती ओम बिर्लांना कोरोना

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू असतानाच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.१९ मार्च रोजी त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून ५८ वर्षीय बिर्ला यांची तब्येत स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार …
 

नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू असतानाच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.१९ मार्च रोजी त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून ५८ वर्षीय बिर्ला यांची तब्येत स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले. अधिवेशन काळात संसदेत प्रवेश करण्यापूर्वी कर्मचारी, पत्रकार, इतर घटक तसेच खासदारांची कोरोना व इतर अनुषंगिक नियमित चाचण्या करण्याचे आदेश अधिवेशपूर्वी बिर्ला यांनीच दिले होते हे विशेष.