लाचखोर तहसीलदाराने पेटवून दिल्या २० लाखांच्या नोटा

राजस्थानातातील प्रकार; लाखाची लाच घेताना अडकला जाळ्यात जयपूर : एखाद्याला अटक होत नाही तोवर त्याची लाचखोरी ही सुरूच असते. पण पकडल्या जाऊ नये या भीतीने लाचखोर अधिकारी काय करतील काही सांगता येत नाही. एका सरकारी कामासाठी एक लाखाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका तहसीलदाराच्या पंटर अधिकार्यास पकडले. पण तिकडे याप्रकरणी तहसीलदाराच्या घराची झडती घेण्यासाठी …
 

राजस्थानातातील प्रकार; लाखाची लाच घेताना अडकला जाळ्यात

जयपूर : एखाद्याला अटक होत नाही तोवर त्याची लाचखोरी ही सुरूच असते. पण पकडल्या जाऊ नये या भीतीने लाचखोर अधिकारी काय करतील काही सांगता येत नाही. एका सरकारी कामासाठी एक लाखाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका तहसीलदाराच्या पंटर अधिकार्‍यास पकडले. पण तिकडे याप्रकरणी तहसीलदाराच्या घराची झडती घेण्यासाठी जेव्हा पथक पोहोचले तेव्हा तेथे स्वयंपाक घरात १५ ते २० लाख रुपयांच्या भारतीय चलनातील नोटा जाळून टाकण्यात आल्याचे आढळून आले.हा प्रकार पाहून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधिकारी,कर्मचारीही थक्क झाले.
राजस्थानात पिंडवाडा येथे महसूल निरीक्षक परतसिंह यांना एक लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. त्याने ही लाच तहसीलदार कल्पेशकुमार जैन यांच्यावतीने स्वीकारल्याचे मान्य केले. त्याच्या सांगण्यावरून पथक जैन यांच्या घरी इतर सांपत्तिक तपशील गोळा करण्यासाठी पोहोचले तेव्हा तेथे स्वयंपाक घरात गॅस शेगडीवर भारतीय चलनातील सुमारे १५ लाख रुपये अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आले. पथक येण्याच्या काहीवेळ आधीच या नोटा त्यांच हाती लागू नयेत म्हणून जाळून टाकण्यात आले होते.या घटनेनंतर पथकाने पोलिसांमार्फत जैन यालाही अटक केली आहे. तपासणीत त्याच्याकडून दीड लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे.