राहुल गांधी अविवाहित आहेत, त्यांच्यापासून मुलींनी दूर राहावे

केरळमध्ये माजी खासदाराचे अजब वक्तव्यराहुल गांधी चर्चेसाठी फक्त मुलींच्याच कॉलेजमध्ये जात असल्याचा आरोपतिरुअनंतपूरम : केरळमध्ये निवडणूक प्रचार जोरात सुरू असून नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघाले आहे. तेथे सीपीएमचे माजी खासदार जॉयस जॉर्ज यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. राहुल गांधी यांच्यापासून तरुण मुलींनी दूर राहिले पाहिजे. कारण ते अविवाहित आहेत.एवढ्यावरच …
 

केरळमध्ये माजी खासदाराचे अजब वक्तव्य
राहुल गांधी चर्चेसाठी फक्त मुलींच्याच कॉलेजमध्ये जात असल्याचा आरोप

तिरुअनंतपूरम : केरळमध्ये निवडणूक प्रचार जोरात सुरू असून नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघाले आहे. तेथे सीपीएमचे माजी खासदार जॉयस जॉर्ज यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. राहुल गांधी यांच्यापासून तरुण मुलींनी दूर राहिले पाहिजे. कारण ते अविवाहित आहेत.एवढ्यावरच न थांबता राहुल गांधी हे केवळ मुलींच्याच कॉलेजमध्ये जातात. मुलींच्याच घोळक्यात चर्चा करतात. राहुल गांधंींपासून मुलींनी दूरच आणि जपूनच राहिले पाहिजे. कारण ते त्यांच्यासाठी अडचणीचे ठरू शकते, असा सल्लाही जॉयस जॉर्ज यांनी मुलींना दिला आहे.
जॉयस जॉर्ज हे असे बोलत असताना सीपीएमचे ऊर्जामंत्री स्टेजवर होते व तेही जॉर्ज यांच्या वक्तव्याला हसून दाद देत होते. आता संतापलेल्या काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी जॉय जॉय यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यांच्या वक्तव्याने आमच्या नेत्याची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.जॉयस जॉर्ज हे २०१४ मध्ये अपक्ष लढून खासदार म्हणून निवडून आले होते.परंतु २०१९ मध्ये काँग्रेस उमेदवाराने इडुक्कीतून पराभूत केले होते.