रंगेल सीएम…!; तिनदा लैंगिक छळाचा आरोप, महिला अधिकाऱ्याला पाठवला होता घाणेरडा मजकूर!

चंदीगढ : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभर मुख्यमंत्री बदलाचे सत्र सुरू आहे. हेच तंत्र काँग्रेसनेही अंगिकारले असून, पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलाचा निर्णय घेतला आहे. चरणजीतसिंह चन्नी यांनी आज, २० सप्टेंबर रोजी नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र चन्नी चांगलेच रंगेल स्वभावाचे असून, त्यांच्यावर तिनदा लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत. एवढ्यावरच न थांबता त्यांनी एका महिला …
 
रंगेल सीएम…!; तिनदा लैंगिक छळाचा आरोप, महिला अधिकाऱ्याला पाठवला होता घाणेरडा मजकूर!

चंदीगढ : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून देशभर मुख्यमंत्री बदलाचे सत्र सुरू आहे. हेच तंत्र काँग्रेसनेही अंगिकारले असून, पंजाबमध्ये मुख्यमंत्री बदलाचा निर्णय घेतला आहे. चरणजीतसिंह चन्नी यांनी आज, २० सप्टेंबर रोजी नवे मुख्यमंत्री म्‍हणून शपथ घेतली. मात्र चन्‍नी चांगलेच रंगेल स्वभावाचे असून, त्‍यांच्‍यावर तिनदा लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत. एवढ्यावरच न थांबता त्‍यांनी एका महिला वरिष्ठ अधिकाऱ्याला चक्‍क घाणेरडा मजकूर असलेले पत्र लिहिले होते.

चन्‍नी हे ५८ वर्षांचे आहेत. जातीय समिकरणातून त्‍यांना काँग्रेसने सीएम केल्याचे सांगण्यात येते. ते रुपनगरच्या चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिले आहेत. अमरिंदर सिंग मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात तंत्रशिक्षण मंत्री म्हणून त्‍यांनी कामकाज सांभाळले आहे. त्‍यांच्यावर एका महिला आयएएस अधिकाऱ्याने २०१८ मध्ये लैंगिक छळाचा आरोप केला होता. चन्नी यांनी त्‍यांना घाणेरडा मजकूर असलेले पत्र पाठवले होते. अकाली दल आणि मायावतींच्या बसपाने युती केली आहे. दलित मते बसपा आणि अकाली दलाकडे जाऊ नयेत यासाठी काँग्रेसने दलित मुख्यमंत्री करण्याची खेळी खेळली असावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण पंजाब राज्यात दलितांची मते ३१ टक्के आहेत.