भांडणानंतर जीपसह पत्नीला दरीत ढकलले; पत्नी ठार पती गंभीर
सिमला : रागाचा पारा चढल्यानंतर माणसे काहीही करतात. हिमाचल प्रदेशात सोलन जिल्ह्यात पती-पत्नीचे कौटुंबीक वादातून कडाक्याचे भांडण झाले. भांडणानंतर पतीचा रागाचा चढला. परंतु त्याने वरतून शांतपणा दाखवत पत्नीला घेऊन जीपमधून घराबाहेर पडला. त्यानंतर जीप एका डोंगरघाटात नेली व तेथून जीपसह पत्नीला चक्क खाली दरीत ढकलून दिले.यात बिचारी पत्नी ठार झाली असून. पती मात्र गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, सोलन जिल्ह्यातील भागडा गावात ही घटना घडली. मृत पत्नीचे नाव आशाकुमारी असे असून तिचे पती सुरेद्रसिंह याच्यासोबत भांडण झाले होते. त्यानंतर रागाच्या भरात सुरेंद्रसिंहने तिला जीपमध्ये बसवून जीप दरीत ढकलून दिली. या प्रयत्नात सुरेंद्रसिंह हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पण पत्नी आशा कुमारी हिचा मात्र जीपसह दरीत पडल्याने मृत्यू झाला.