बिहारमध्ये सिलिंडरच्या स्फोटात एकाच कुटुंबातील पाच जण जळाले

चार मुलांचा होरपळून मृत्यू किशनगंज : बिहारमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने घराला आग लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यात चार बालकांचा व पित्याचा समावेश आहे. तर मुलांची आई गंभीररित्या भाजली असून तिचीही प्रकृती नाजूक आहे. ही दुर्घटना किशनगंज शहरात सोमवारी सकाळी घडली. सिलिंडरचा मोठा स्फोट झाला व त्याचा आवाज परिसरात दूरपर्यंत ऐकू …
 

चार मुलांचा होरपळून मृत्यू

किशनगंज : बिहारमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने घराला आग लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यात चार बालकांचा व पित्याचा समावेश आहे. तर मुलांची आई गंभीररित्या भाजली असून तिचीही प्रकृती नाजूक आहे. ही दुर्घटना किशनगंज शहरात सोमवारी सकाळी घडली. सिलिंडरचा मोठा स्फोट झाला व त्याचा आवाज परिसरात दूरपर्यंत ऐकू गेला. आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण संपूर्ण घर आगीत वेढले गेले. त्यामुळे आतील सदस्यांना बाहेर पडता आले नाही. आगीत होरपळून चार मुलांसह पाच जण मृत्यमुखी पडले. स्थानिक प्रशासनाने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.