बाल्कनीत येऊन उभ्या राहिल्या अनेक विवस्त्र महिला

पोलिसांनी ठोकल्या बेड्या; फोटो सेंड करणारेही तुरुंगात दुबई : दुबई येथे एक विचित्र घटना घडली आहे. शहरातील एका बड्या मार्केट परिसरातील लोक अचानक चक्रावून गेले. कारण त्यांच्या शेजारच्या बाल्कनीमध्ये अनेक महिला विवस्त्रावस्थेत येऊन उभ्या राहिल्या. एक, दोन नव्हे तर पाच-पन्नास महिला अंगावर बोटभर कपडाही नसलेल्या अवस्थेत बाल्कनीत येऊन हसत-हसत उभ्या राहिल्या. असे त्यांनी कशासाठी केले …
 

पोलिसांनी ठोकल्या बेड्या; फोटो सेंड करणारेही तुरुंगात

दुबई : दुबई येथे एक विचित्र घटना घडली आहे. शहरातील एका बड्या मार्केट परिसरातील लोक अचानक चक्रावून गेले. कारण त्यांच्या शेजारच्या बाल्कनीमध्ये अनेक महिला विवस्त्रावस्थेत येऊन उभ्या राहिल्या. एक, दोन नव्हे तर पाच-पन्नास महिला अंगावर बोटभर कपडाही नसलेल्या अवस्थेत बाल्कनीत येऊन हसत-हसत उभ्या राहिल्या. असे त्यांनी कशासाठी केले त्याचे कारण समजू शकले नाही.परंतु ही बाब लक्षात आल्यावर अनेक बघ्यांनी त्यांचे फोटो काढले, व्हिडिओ काढून ते सोशल मीडियातून व्हायरल केले.पण काही तासांत हे प्रकरण पोलिसांत पोहोचले.पोलिसांनी त्या सर्व महिलांना तर अटक करुन तुरुगांत टाकलेच. पण ज्यांनी फोटो/ व्हिडिओ काढून ते शेअर केले होते.त्यांनाही पोलिसांनी तुरुंगाची हवा दाखवली.कारण दुबईत दारू पिणे, अश्लील कंटेंट शेअर करण्यावर कठोर बंदी आहे. असे करणार्‍यांना चक्क तुरुंगात टाकले जाते. त्यात ही घटना तर प्रत्यक्ष घडल्याने पोलिसांनी कठोर अ‍ॅक्शन घेतली.संयुक्त अरब अमिरातीमध्ये पब्लिक डीसेंन्सी लॉचा अपमान समजून यातील आरोपींना किमान सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि १ हजार पाउंडचा दंड लावला जातो. दुबईच्या दैनिकाने हा प्रकार एका कंपनीच्या प्रमोशनसाठी केलेली स्टंटबाजी असल्याचे म्हटले आहे.