पोलिस ठाण्यातच लागलं प्रेमी युगुलाचं शुभमंगल सावधान!

पाटणा : पोलिस ठाणे म्हणजे शिव्यांची लाखोली.. थर्ड डिग्रीची भाषा..मारहाण..; परंतु बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील डेहरी महिला पोलिस ठाण्याला मंगल कार्यालयाचं स्वरुप आलं होतं. एका प्रेमी युगुलानं पोलिसांच्या साक्षींनं सप्तपदी केली. बालपणाच्या प्रेमींना पोलिसांनी एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याची संधी दिली. मुलगा आणि मुलगी विवाहाला तयार असतात; परंतु दोन्हीकडची मंडळी त्यात आडकाठी आणतात. बिहारमध्येही तसेच घडले. टंडवा येथील …
 

पाटणा : पोलिस ठाणे म्हणजे शिव्यांची लाखोली.. थर्ड डिग्रीची भाषा..मारहाण..; परंतु बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील डेहरी महिला पोलिस ठाण्याला मंगल कार्यालयाचं स्वरुप आलं होतं. एका प्रेमी युगुलानं पोलिसांच्या साक्षींनं सप्तपदी केली. बालपणाच्या प्रेमींना पोलिसांनी एकमेकांसोबत आयुष्य घालवण्याची संधी दिली.

मुलगा आणि मुलगी विवाहाला तयार असतात; परंतु दोन्हीकडची मंडळी त्यात आडकाठी आणतात. बिहारमध्येही तसेच घडले. टंडवा येथील अभयकांत आणि पडुहारची प्रियंका हे बालपणापासूनचे मित्र. त्यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते; परंतु या प्रेमविवाहाला मुलगा आणि मुलीकडचे कुटुंब तयार नव्हते. मुलीनं महिला पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी मुलाला बोलावलं. तो लग्नासाठी तयार होता. दोघांच्या संमतीनंतर पोलिस ठाण्याच्या आवारात दोघांचा विधिवत विवाह झाला. दोघांचे नातेवाइक लग्नाला तयार नसल्यानं प्रियंका चार वेळा घरातून पळून गेली होती. तिच्या कुटुंबानं प्रत्येक वेळी तिला घरी आणलं. आता तिनं सरळ पोलिस ठाणं गाठलं. तिनं सगळी कहाणी सांगितल्यानंतर पोलिस अधिकारी आणि पोलिसांसमोरच दोघांच्या लग्नाची गाठ बांधली गेली.